औरंगाबादमध्ये खळबळ..बांधकाम मिस्त्री म्हणून घरात इंट्री, मोबाईल ‘ डेटा रिकव्हर ‘ अन..

शेअर करा

एक खळबळजनक घटना महाराष्ट्रात समोर आलेली असून बांधकाम करणारा मिस्तरी याने औरंगाबाद शहरात एका विवाहित महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला आणि त्या आधारे अनेक वेळा तिला वेरूळ परिसरात नेऊन तिच्यावर त्याने अत्याचार केले असा प्रकार समोर आलेला आहे. अत्याचार करणाऱ्या या मिस्‍तरीसोबत तिने संबंध तोडल्यानंतर त्याने विवाहित महिलेच्या पतीला हा व्हिडिओ दाखवण्याची धमकी देखील दिली. हतबल झालेल्या महिलेने अखेर मुकुंदवाडी ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, भानुदास किसन घोडे ( वय 40 राहणार मुकुंदनगर मुकुंदवाडी ) असे आरोपीचे नाव असून तो बांधकामाचा मिस्त्री म्हणून काम करतो. सदर आरोपीकडे महिलेचा पती हा तीन वर्षापूर्वी कामाला होता त्यामुळे भानुदास हा महिलेच्या घरी ये-जा करत असायचा त्यातून त्याने या महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ तीन वर्षांपूर्वी मोबाईलमध्ये बनवला होता. व्हिडीओ बनवल्यानंतर आठ दिवसांनी त्याने हा व्हिडीओ तुझ्या नातेवाईकांना दाखवीन अशी धमकी देत महिलेला वेरुळ येथे बोलावले आणि तिथे एका लॉजवर नेऊन तिच्यासोबत अनेकदा अत्याचार केला. याच व्हिडिओचा वापर करून त्याने त्यानंतरही अनेकदा आपल्यावर अत्याचार केले असे महिलेचे म्हणणे आहे.

महिलेने म्हटले आहे की, मागील महिन्यात आरोपीने आपल्याला जय भवानी चौकातील मातोश्री लॉन येथे घेऊन जात आपल्यावर अत्याचार केला त्यावेळी महिलेने त्याची नजर चुकवून त्याचा मोबाईल पाण्यात टाकला त्यामुळे त्यातील व्हिडिओ डिलीट झाले आणि महिलेने त्याच्यासोबत बोलणे सोडून दिले त्यानंतर पुन्हा 27 जुलै रोजी त्यांनी आपण हा डाटा रिकव्हर केलेला आहे असे सांगून तिला पुन्हा एकदा ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

दोन ऑगस्ट रोजी दुपारी तिचा पती घरी असताना आरोपी भानुदास याने महिलेच्या पतीच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून तिचे आणि आरोपीचे वेरूळ इथे काढलेले फोटो आणि व्हिडिओ पतीला पाठवून दिले. आपल्या पत्नीचे असे व्हिडीओ पाहून पती-पत्नीत वाद झाले आणि त्यानंतर पत्नीने आपली बाजू पतीला समजावून सांगितल्यानंतर दोघांनीही जाऊन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर आरोपीला जेरबंद करण्यात आलेले आहे.


शेअर करा