अखेर घराजवळील विहिरीत ‘ त्या ‘ चिमुरड्याचा मृतदेह सापडला , आरोपी नातेवाईकच

शेअर करा

अत्यंत संतापजनक घटना सातारा शहराजवळ कोडोली येथे उघडकीस आलेली असून अष्टविनायक कॉलनीमध्ये घरगुती वादातून सख्ख्या भावाच्या मुलाला विहिरीत फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीला आलेली असून शलमोन मयूर सोनवणे असे या बाळाचे नाव आहे. सदर प्रकरणी त्याचा चुलता अक्षय मारुती सोनवणे याला सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, अक्षय मारुती सोनवणे हा या मुलाचा चुलता असून त्याने सख्ख्या भावाच्या मुलाला चॉकलेट देतो असे आमिष दाखवत आपल्यासोबत घेतले होते. अक्षय आणि त्याचा भाऊ मयूर यांच्यात वाद आहे त्यातून भावाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने त्याने त्याच्या मुलाला सोबत घेतले आणि दत्तनगर येथील एका विहिरीत फेकून दिले. घरच्यांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही त्यानंतर कॉलनीतील एका मुलाला विहिरीत मृतदेह असल्याचे आढळले आणि हे प्रकरण समोर आले.

विहिरीत लहान मुलगा पडलेला आहे हे समजल्यानंतर नागरिकांनी तिथे धाव घेतली आणि त्याला बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपासाच्या दरम्यान त्याचा चुलता असलेला अक्षय सोनवणे हा त्याला घेऊन गेला होता त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. अक्षय सोनवणे हा स्वभावाने अत्यंत तापट असून धरसोड प्रवृत्तीचा असल्याने त्याला घरात फारशी किंमत नव्हती. आपल्याला घरात किंमत दिली जात नाही याउलट आपला भाऊ यालाच सगळेजण मान देतात या हेतूने त्याच्यामध्ये द्वेषाची भावना जागृत झाली होती मात्र भावासोबत असे काही करण्याची हिंमत नसल्याने त्याने भावाच्या मुलाचा जीव घेतलेला आहे.

अक्षय सोनवणे हा अविवाहित असून सातारा एमआयडीसी इथे एका कंपनीत काम करतो. कंपनीमध्ये देखील त्याचे फारसे कुणाशी पटत नाही आणि अनेकदा त्याने वाद देखील केलेले आहेत. घरी देखील त्याचे कुणाशी पटत नाही आणि त्याच्या या स्वभावामुळे अद्यापपर्यंत त्याचे लग्न देखील जमलेले नाही. भावाचा संसार सुखाने चालू आहे आणि आपल्याला कुणी विचारत नाही या भावनेने त्याच्या मनात भावाविषयी द्वेष तयार झाला होता मात्र त्यातून त्याने भावाच्या मुलाचा जीव घेतलेला आहे. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे या प्रकरणाचा तपास करत आहे.


शेअर करा