संतापजनक..पाथर्डीत वॉरंट बजावण्यास आलेल्या पोलिसाला फरफटत नेले

एक अत्यंत खळबळजनक घटना पाथर्डी जिल्ह्यात समोर आली असून वारंट असल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला काही जणांनी जमून मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. पळून जाणाऱ्या आरोपीच्या मोटरसायकलला पाठीमागून पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला त्यावेळी 20 ते 25 मीटर आरोपी अफजल पठाण याने पोलिसाला फरफटत नेले. सदर प्रकरणात पोलीस कर्मचारी आकाश चव्हाण हे जखमी झालेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रकार हा गुरुवारी रात्री माणिकदौंडी परिसरातील एका हॉटेलसमोर घडलेला असून आरोपी अफजल पठाण याच्यासह पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस न्यायालयाचे पकड वॉरंट त्याच्या विरोधात जारी करण्यात आले होते त्यावेळी पोलिस कर्मचारी आकाश चव्हाण आणि दुसरे एक पोलिस कर्मचारी यांना तो माणिकदौंडी येथील एका हॉटेलवर असल्याची माहिती समोर आली त्यावेळी त्यांनी हॉटेलवर जाऊन त्याला तुमच्या नावाचे वॉरंट आहे असे सांगितले.

आरोपी अफजल पठाण याने त्यावेळी पोलिसांना धमकावत ‘ तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही का ? तुम्ही माझ्याकडे येऊ नका. मी तुम्हाला तसे सोडणार नाही , ‘ अशी धमकी दिली आणि त्यानंतर मोटरसायकलवर बसवून तो पळून जाऊ लागला त्यावेळी पोलिस कर्मचारी आकाश चव्हाण यांनी त्याच्या गाडीला पाठीमागून पकडले मात्र त्याने गाडी तशीच फरफटत नेली त्यानंतर तिथे अतिक अफजल पठाण, अशोक पठाण व इतर दोन जण अशा व्यक्तींनी आकाश चव्हाण यांच्यावर हल्ला केला त्यावेळी आकाश चव्हाण यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना प्रतिकार केला. आकाश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अफजल पठाण आणि इतर चार जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच सरकारी कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .