स्ट्रगलिंग अभिनेत्रीला स्टॉक ब्रोकरने भेटायला बोलावले अन.., मुंबईतील घटना

एक खळबळजनक घटना मुंबई येथे समोर आलेली असून एका स्ट्रगलिंग अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीला आली आहे. पश्चिम मुंबई येथील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून मुंबईतील प्रसिद्ध टॉप स्टॉक ब्रोकर असलेला व्यापारी याला अटक करण्यात आलेली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका हॉटेलमध्ये अभिनेत्री आणि मॉडेलवर अत्याचार करण्यात केल्यावर तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता.

सदर प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहता याच्याविरोधात अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मेहता याने पीडित तरुणीला अंधेरी एमआयडीसी येथील एका खोलीत भेटण्यासाठी बोलावले होते मात्र तरुणी तिथे पोहोचले असता त्याने तिच्यावर अत्याचार करून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला मात्र तिने आरडाओरडा केल्याने हॉटेलचे कर्मचारी तात्काळ धावून तिथे पोहोचले आणि त्याच्या तावडीतून तिची सुटका केली असे पीडितेचे म्हणणे आहे .