‘ धर्मांतराचा हेतू घेऊन गावात आले खरे मात्र.., महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

भारताच्या घटनेनुसार प्रत्येक नागरिकाला आपले धार्मिक स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार आहे मात्र आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना अनेकदा धर्मांतराचे आमिष दाखवत त्यांचे धर्मांतर करून घेण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. जुन्या धर्माविषयी तिरस्कार निर्माण व्हावा अशी पुस्तके त्यांना वाचायला देण्यात येतात आणि आमचाच धर्म कसा श्रेष्ठ आहे असे संदर्भ देत त्यांचे ब्रेन वॉश करण्यात येते. अशीच एक संतापजनक घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे उघडकीला आलेली असून डहाणू नगरपरिषद हद्दीतील सरावली येथे एका महिलेला पैशाचे आमिष देऊन धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती धर्मप्रसारक यांचा डाव स्थानिक ग्रामस्थांनी महिलेच्या सोबत उधळून लावलेला आहे. आरोपींच्या विरोधात डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शुक्रवारी दुपारी डहाणूजवळ असलेल्या सरावली तलाव पाडा येथे चार ते पाच ख्रिश्चन मिशनरी एकत्र जमलेले होते त्यावेळी त्यांनी एका आदिवासी महिलेच्या घरात जाऊन ‘ तुम्ही आमचा धर्म स्वीकारला तर तुमचे सर्व आजार बरे होतात तसेच तुमच्या सर्व दुःखांचा नायनाट होईल. आर्थिक मदत आम्ही तुम्हाला करू मात्र त्यासाठी तुम्ही तुमचा मूळ धर्म सोडून तुम्हाला ख्रिश्चन धर्मात यावे लागेल, ‘ असे देखील या महिलेला सांगण्यात आले होते अशी तक्रार या महिलेने पोलिसात दिली आहे.

आपल्या गावात ख्रिश्चन धर्मप्रसारक आल्याचे समजताच आणि ते आर्थिक आमिष देऊन धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्षात आल्यावर गावातील ग्रामस्थ एकत्र जमले आणि त्यांनी या ख्रिश्चन धर्मप्रसारक यांना जाब विचारायला सुरु केले. ख्रिश्चन धर्म प्रसारक यांना गावकऱ्यांच्या या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाही म्हणून प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आणि अखेर या महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. क्लेमेंट बैला, मरियामा फिलिप्स, पिंकी शर्मा कौर आणि आणि परशुराम धर्मा अशी आरोपींची नावे असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


शेअर करा