‘ तुमची लाडकी मुलगी घ्या ‘, सासुरवाडीच्या दारात बायकोचे शीर ठेवून आरोपी फरार

एक अत्यंत खळबळजनक घटना देशात समोर आली असून पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर चक्क तिचे शीर कापून माहेरी पाठवून दिल्याचा प्रकार बिहार येथील मधेपुरा येथे घडलेला आहे. बायकोची हत्या केल्यानंतर या आरोपीने दीड वर्षाच्या मुलीचे देखील शीर कापून टाकले. सदर प्रकारानंतर दोन मुलांना घेऊन तो फरार झाला. कापलेल्या शिरांच्या जवळ एक पत्र देखील पोलिसांना आढळून आले असून आरोपीच्या आईला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत .

मोहम्मद जिब्राईल असे आरोपीचे नाव असून कौटुंबिक वादातून शुक्रवारी रात्री त्याने त्याची पत्नी मूरसुदा खातुन आणि त्याची दीड वर्षाची मुलगी जिया परवीन यांची अत्यंत अमानुषपणे हत्या केली. आपल्या पत्नीचे इतर व्यक्ती सोबत अनैतिक संबंध आहे असा त्याला संशय होता आणि त्यातून त्याने हे कृत्य केले. शनिवारी सकाळी तो पत्नीचे टाकलेले शिर घेऊन तिच्या माहेरी गेला आणि तिच्या माहेरपासून फक्त 200 मीटरवर असलेल्या पुलावर तिचे शिर ठेवले.

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिक जात असताना पुलावर हे शीर पाहिल्यानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली आणि अवघ्या काही मिनिटात पोलिस तिथे पोहोचले तेव्हा शिरांच्या खाली ‘ तुमची लाडकी मुलगी ‘ असे देखील लिहिलेले होते. आरोपीने माहेरकडच्या लोकांना व्हाट्सअपवर हत्या केल्याचा व्हिडिओ आणि धमकी देणारे रेकॉर्डिंग देखील पाठवलेले आहे.

संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलिस ठाण्यात जाऊन जोरदार प्रदर्शन केले आणि मृतदेहाचा पंचनामा करण्यात देखील अडथळे निर्माण केले. मयत महिलेच्या दोन मुलांचा आणि आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली असून पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.