गोवा हादरलं..उच्चभ्रू कुटुंबातील आईने पोटच्या मुलीचा घेतला जीव अन त्यानंतर

एक अत्यंत खळबळजनक घटना गोव्यात समोर आली असून पोटच्या चौदा महिन्याच्या मुलीचा नाक तोंड दाबून आईनेच खून केलेला आहे. चिखली वास्को येथे ही घटना घडलेली असून मुलीची हत्या केल्यानंतर या आईने नदीत उडी घेऊन जीव देण्याचा देखील प्रयत्न केला मात्र एका कंपनीच्या कामगारांनी तिला पाण्यातून बाहेर काढून तिचा जीव वाचवून तिला दवाखान्यात दाखल केले आहे. निमिषा गोणे असे या क्रूर मातेचे नाव आहे.

निमिषा हिचा विवाह काही वर्षांपूर्वी निलेश गोणे याच्यासोबत झालेला होता. निलेश हा जर्मनीमध्ये काम करत असून निमिषा ही देखील काही काळापासून आपला पती आणि मुली सोबत जर्मनी येथे राहत होती मात्र एक आठवड्यापूर्वी ती मुलीला घेऊन गोवा इथे आली होती. चिखली येथे तिचे माहेर असून वडिलांच्या घरी ती राहत होती. पतीला सोडून आल्यानंतर तिचे मानसिक स्वास्थ चांगले नव्हते आणि ती नैराश्यात गेलेली होती.

शनिवारी सहा तारखेला पहाटे तिने तिच्या 14 महिन्याच्या मुलीचा नाक अन तोंड दाबून खून केला आणि तिचा मृतदेह घरात ठेवून ती शेजाऱ्यांची चारचाकी गाडी घेऊन परिसरातील एका पुलावर गेली आणि गाडी बाजूला लावून तिने नदीत उडी मारली. एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ नदीत उडी घेऊन तिला त्यातून बाहेर काढले आणि दवाखान्यात दाखल केले.

निमिषा हिच्या वडिलांनी घरात तिची मुलगी मयत अवस्थेत आढळून आल्यावर पोलिसांना या प्रकाराची खबर दिली आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी निमिषा हिने नैराश्यातून हा प्रकार केल्याचे समोर आले असून पोलिसांनी तीच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. मुलीची हत्या केल्यानंतर पुलावरून उडी घेण्याआधी तिने आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रकार केला आणि त्यानंतर नदीत उडी घेतली मात्र तिला वाचवण्यात यश आले असून निमिषा ही नैराश्यात होती अन त्यातून हा प्रकार तिने केलेला आहे.