शिर्डीतील ‘ त्या ‘ बॅगने उडवली खळबळ , अवघ्या काही मिनिटात पथक दाखल अन..

नगर जिल्ह्यात शिर्डी इथे देशभरातून अनेक भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते मात्र अशातच रविवारी सात तारखेला दुपारी चारच्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशनजवळ रस्त्याच्या मधोमध एक बेवारस बॅग आढळून आली होती त्यानंतर पोलीस पथकाने बॉम्बशोधक पथक, श्वानपथक यांना सोबत घेत तिथे धाव घेतली त्यावेळी त्यामध्ये एका महिलेचे कपडे आढळून आलेले आहेत.

शिर्डी शहरात सध्या अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे, पोलीस कर्मचारी फिरोज पटेल, अविनाश मकासरे यांना या घटनेची माहिती कळताच अवघ्या पाच मिनिटात शिर्डी बॉम्बशोधक पथक, कर्मचारी, वाहन आणि आधुनिक तंत्रज्ञान घेऊन मोठ्या प्रमाणात फौजफाटा दाखल झाले होते मात्र तपासले असता त्यामध्ये अज्ञात महिलेचे कपडे आढळून आलेले आहे त्यामुळे नागरिकांनी आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे.