‘ एक तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी ‘, केसरकर यांच्यावर निशाणा

शेअर करा

एकीकडे राज्यात एकनाथ शिंदे गट आणि आणि भाजप यांच्यात सलोखा असला तरी कोकणातील दोन दिग्गज नेते दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातील वाद जुनाच असून अद्यापही तो वाद मिटलेला नाही. दीपक केसरकर हे नारायण राणे यांचे जुने कट्टर विरोधक असून सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गटात ते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गट आणि भाजप यांच्यात सलोखा असला तरी हे दोन नेते एकमेकांवर निशाणा साधताना पहायला मिळत आहेत.

माजी खासदार निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की , ‘ केसरकर म्हणतात मी राणेसोबत काम करायला तयार आहे तर मग नोकरी मागायची तर नीट माग. एक तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे, ‘ अशा शब्दांत हल्लाबोल केलेला आहे.

दिपक केसरकर यांनी यानंतर प्रतिक्रिया देताना मी राणे यांच्याबद्दल चांगले बोललो किंवा वाईट बोललो तरी माझ्या वक्तव्याचा संदर्भ त्यांच्याशी जुन्या असलेल्या वादाशी जोडला जातो त्यामुळे यापुढे पत्रकार परिषदेत मी त्यांचे नाव घेणार नाही असे म्हटले आहे.


शेअर करा