पुण्यात महिला पोलिसांकडून हमालाला हात पिरगाळून मारहाण , कुठे घडली घटना ?

शेअर करा

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून सदर प्रकरणी संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोणीकाळभोर परिसरातील उरुळी कांचन येथील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने एका गरीब हमालाला अश्लिल शिवीगाळ करीत बेदम मारहाण केलेली आहे.

बुधवारी संध्याकाळी ही घटना घडलेली असून सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. किशोर निवृत्ती गरड ( वय 35 राहणार उरुळी कांचन ) असे मारहाण करण्यात आलेल्या हमालाचे नाव असून भारती होले असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ऊरुळी कांचन येथील पोलीस चौकीत कार्यरत असताना शिंदवणे गावाच्या रस्त्यावर किराणा मालाच्या दुकानासमोर गरड हे माल उतरत असताना रस्त्यावर टेम्पो उभा का केला ? असा प्रश्न विचारत भारती होले यांनी आपल्याला मारहाण केली अशी माहिती परिसरातील नागरिकांकडून देण्यात येत आहे.

किशोर गरड यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारू नका झालं गेलं चुकलंय, असे म्हणत माफी मागण्याचा प्रयत्न केला मात्र भारती होले काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. सदर घटनेची माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर धायगुडे यांनी घटनास्थळाला भेट घेतली आणि त्यानंतर नागरिकांकडून माहिती जमा करून पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. पुणे शहरात शहरासह जिल्ह्यात पोलिसांच्या वर्तनाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असून किरकोळ कारणावरून नागरिकांना हाणामारी करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.


शेअर करा