औरंगाबादमध्ये चाललंय काय ? ‘ हा ‘ फोटो तुम्हाला आलाय काय ? : वाचा बातमी

शेअर करा

कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेला नातेवाईकांनी जंगलात सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद इथे उघडकीस आला होता. सुदैवाने जंगलात सोडलेल्या त्या आजीनी आता कोरोनावर मात केलेली आहे . अशाच स्वरूपाचा आणखी एक प्रकार पुन्हा औरंगाबादमध्येच उघडकीस आला असून औरंगाबादमध्ये कोविड सेंटरमध्ये खाटा रिकाम्या असतानाही एका करोनाबाधित वृद्ध महिलेला चक्क झाडाखाली ऑक्सिजन लावल्याचा फोटोही व्हायरल झाला आहे. औरंगाबादकरांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला असून संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईची करण्याची मागणी होत आहे.

औरंगाबादच्या वाळूज परिसरातील गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये शनिवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका ६७ वर्षीय वृद्धेला करोनाची लक्षणं जाणवल्याने तिला गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये आणण्यात आले होते. मात्र, कम्युनिटी सेंटरमध्ये ४० खाटा रिकाम्या असूनही या वृद्ध महिलेला सेंटर बाहेरच्या झाडाखाली बसवण्यात आले. महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामुळे त्यांना जागेवरच ऑक्सिजन लावण्यात आला असे स्पष्टीकरण याबाबत कम्युनिटी सेंटरकडून देण्यात आलेले आहे .

सदर फोटो व्हायरल झाल्यानंतर शासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले असून या वृद्धेला तातडीने गंगापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. औरंगाबादमधील कोविड सेंटरमध्ये खाटा रिकाम्या असताना रुग्णांवर झाडाखाली उपचार होतातच कसे?, असा सवाल भाजपचे आमदार अतुल सावे यांनी केला आहे.


शेअर करा