औरंगाबाद हादरलं..पोलिसांच्या व्हाट्सएप्प ग्रुपवर प्रेयसीच्या खुनाची कबूली अन त्यानंतर..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना औरंगाबाद शहरात उघडकीस आली असून तीन दिवसांपूर्वी प्रेयसीचा निर्घृणपणे खून करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा प्रकार समोर आला आहे .अंकिता महेश श्रीवास्तव ( रा. जालना) असे मृत तरुणीचे तर सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे सौरभ याने स्वतः पोलिसांच्या ग्रुपमध्ये ‘ मी हा खून केला असून मी पोलिसात दाखल होत आहे ‘ असे पोस्ट केले होते त्यानंतर देवगाव रंगारी पोलिसांनी सौरभ यास अटक केली आहे .

उपलब्ध माहितीनुसार , सौरभ लाखे हा शिऊर येथील असून स्थानिक पत्रकार म्हणून कार्यरत आहे. सौरभ लाखे आणि अंकिता महेश श्रीवास्तव दोघेही शेजारी रहायला होते तेव्हा त्यांच्यात विवाहबाह्य प्रेम संबंध निर्माण झाले.सौरभ आणि अंकिता हे काही दिवसांपासून औरंगाबाद येथील हडको भागात भाड्याच्या घरात राहत होते मात्र आज सकाळी घरातून दुर्गंधी येत असल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले आणि त्यावेळी अंकिता हिच्या शरीराचे तुकडे तुकडे केल्याचे आढळून आले.

आज सकाळीच सौरभ याने पोलिसांच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये ‘मी खून केला आहे’ असा मेसेज केला होता तसेच मी पोलिसात दाखल होत आहे असे देखील लिहलेले होते मात्र पोलिसांनी वेळ न दवडता तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे समजते.


शेअर करा