गुजरातमध्ये मुंबई पोलिसांची मोठी कारवाई , कंपनीत घुसून केलेल्या कारवाईत तब्बल..

शेअर करा

गुजरातमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची रॅकेट कार्यरत असल्याचे समोर येत आहेत. अशीच एक कारवाई मुंबई पोलिसांनी केलेली असून गुजरातच्या भरूच जिल्ह्यात मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत ड्रग्स उत्पादित करणारा एक कारखाना उध्वस्त करण्यात आलेला आहे. मुंबई पोलिसांनी तिथे सुमारे ५१३ किलो एमडी ड्रग्स जप्त केलेले आहे. या अमली पदार्थाची किंमत साधारण 1026 कोटी रुपये असल्याचे समजते. सदर प्रकरणात पोलिसांनी एका महिलेसह सात जणांना मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई पोलिस दलाच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने काही महिन्यांपूर्वी शहरातील गोवंडी शिवाजीनगर भागात कारवाई केली त्यावेळी या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार हे गुजरातमध्येच असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी कंबर कसली होती. त्यानंतर गुजरातमधील अंकलेश्वर भागात एका कारखान्यावर छापा मारला त्यावेळी पोलिसांनी 513 किलो एमडी ड्रग्स जप्त केले आणि सात जणांना अटक केली.

आरोपींपैकी पाच जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे तर दोन जणांना अमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ही टोळी शाळकरी मुले यांना आपले लक्ष करत होती. गुजरात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी 422 गुन्हे दाखल केले आहेत तर आत्तापर्यंत 25699 किलो अमली पदार्थ जप्त केलेले आहेत त्याची किंमत सुमारे पाच हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे समजते.


शेअर करा