गर्भवती बायको माहेरी असल्याने डेटिंग ऐपवर तरुणीसोबत केले ‘ नको ते ‘ मात्र … : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

एका डेटिंग ऐपवर त्याची आणि तिची ओळख झाली होती. पीडित तरुणाची बायको गर्भवती असल्याने ती माहेरी गेली होती. तरुणाला अशा वेळी ती ऑनलाईन साईटवर भेटल्याने त्याने तिच्यासोबत ऑनलाईन सेक्सचा प्लॅन केला . त्याच्या या प्लॅनला ती किरकोळ पैसे घेऊन तयार झाल्याने तरुणाचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला. एकदा ठरवून त्यांनी कॅमेरासमोर ‘ नको नको ‘ते सगळे केले मात्र दुसऱ्याच दिवशी सदर तरुणाची क्लिप त्या महिलेने त्याला व्हाट्सएप्पवर पाठवून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. ही धक्कादायक घटना मुंबई येथील मीरा रोड परिसरात घडली असून पोलिसांनी त्या अनोळखी व्यक्तीविरुध्द्व गुन्हा नोंदवला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय तरूण मुंबईतील मिरा रोड इथे राहणारा असून एका प्रतिष्ठित खाजगी कंपनीत तो नोकरी करतो. मिरा रोड परिसरात तो पत्नीसोबत राहतो. त्याची पत्नी गरोदर असून ती आपल्या माहेरी गेली असल्याने हा तरुण घरी एकटाच आहे. एकटा असल्याने त्याने आपल्या मोबाइलवर डेटिंग ऐप डाउनलोड केले आणि त्यानंतर तो या ऐपच्या माध्यमातून मुलींसोबत चॅटिंग करायला लागला त्याचवेळी त्याने त्याचा मोबाईल नंबर देखील शेअर केला…

त्यानंतर एके रात्री त्याला डेटिंग साइटवरून एक कॉल आला. कॉल करणाऱ्या समोरील मुलीने त्याला ऑनलाइन सेक्सची ऑफर केली. ३० मिनिटे सेक्स करण्यासाठी पाचशे रुपये घेणार असल्याचे सांगितले. पीडित तरुण हा पैशाने श्रीमंत असल्याने आणि कसलीच भीती न वाटल्याने त्याने तिची ही ऑफर लगेच स्वीकारली आणि २३ ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉलद्वारे ऐपच्या माध्यमातून दोनदा त्या तरुणीसोबत ऑनलाइन ‘ नको नको ‘ ते प्रकार केले.

झाले गेले संपले अशा अविर्भावात तो तरुण असतानाच त्याच्या व्हाट्सऐप एक मेसेज आला. मेसेज उघडून पाहताच त्याला धक्काच बसला. ज्या तरुणीशी त्याने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तसला प्रकार केला होता त्या तरुणीने त्याचा सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवला होता आणि त्याला हा व्हिडीओ पाठवून त्याच्याकडे ११ हजार रुपयांची मागणी केली होती.

व्हिडिओ डिलिट करण्यासाठी पैसे दे अन्यथा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी देखील तिने दिली. तरुणाच्या पायाखालची वाळूच सरकली आणि त्याने तात्काळ मिरा रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेची चौकशी सुरू आहे.


शेअर करा