देशात एकीकडे बेरोजगारीने युवक हैराण असताना अशीच एक दुर्दैवी घटना औरंगाबाद येथे उघडकीला आलेली आहे. वादात सापडलेल्या अग्निविर योजनेत काही दिवस का होईना आपल्याला रोजगार मिळेल या आशेने मैदानावर एक युवक चाचणीसाठी दाखल झाला होता मात्र मैदानी चाचणी दरम्यानच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. करण नामदेव पवार ( वय 20 राहणार शिरजापुर तांडा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद ) असे त्याचे नाव असल्याचे समजते.
करण हा अत्यंत गरीब कुटुंबातील असून आई सतत आजारी राहत असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती होती. वडील एका कंपनीत मजूर म्हणून काम करतात आणि आणि काहीतरी रोजगार हवा म्हणून तो अग्निविर योजनेत भरती होण्यासाठी औरंगाबाद येथे आलेला होत. सहा महिन्यापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते . गेली सहा वर्षे तो सैन्यात भरतीसाठी प्रयत्न करत होता मात्र केंद्राने अचानकपणे काही दिवस रोजगार देणारी अग्निविर योजना आणली मात्र तरीदेखील त्याने काही दिवस का होईना निदान आपल्याला रोजगार मिळेल या आशेने या योजनेत भरती होण्यासाठी औरंगाबाद गाठले होते.
अग्निविर योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावरील मैदानावर भरतीची प्रक्रिया सुरू असताना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. करण आणि त्याचा लहान भाऊ सागर हे साठी भरती प्रक्रिया साठी शहरात आले होते. रात्री दोनच्या सुमारास धावण्याच्या चाचणी स्पर्धेत करण सहभागी झाला आणि अवघे काही अंतर बाकी राहिलेले असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्याला दवाखान्यात नेले असता त्याचा मृत्यू झालेला होता. सदर प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे .