‘ ही ‘ माझी होणारी बायको तिच्याशी नीट वागायचं, फिर्यादीच्या कंपनीत घुसून भरला दम

शेअर करा

मैत्रिणीच्या सोबतचे काढलेले फोटो जर दुसऱ्या कुणाशी लग्न करशील तर पाठवेन अशी धमकी देऊन ब्लॅकमेल केल्या प्रकरणी पुणे इथे दोन सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल झाला असून वैभव दिलीप कातोरे, रोशन दिलीप कातोरे (दोघे रा. ओंकारपुरम सोसायटी, कोथरुड) अशी त्यांची नावे आहेत. एका २५ वर्षीय युवतीने त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार,फिर्यादी तरुणी आणि वैभव कातोरे हे दोघे देखील नाशिक येथील असून नाशिकला त्यांची एका कोचिंग क्लासमध्ये मैत्री झाली होती. नाशिकला शिक्षण झाल्यावर तरुणी पुण्यात नोकरीसाठी आली. ती पुण्यात असताना देखील वैभवने फोनवर गोड गोड बोलून तिच्याशी मैत्री कायम ठेवली आणि काही काळानंतर तो देखील आपल्या भावासह पुण्यात रहावयास आला. पुण्यात आल्यावर तो वारंवार फोन करुन तिला लग्न करण्यासाठी जबरदस्ती करू लागला. एकदा तर तिच्या कंपनीमध्ये येऊनही वैभवने ती आपली बायको असून तिच्याशी नीट वागायचे, असा सज्जड दम देखील त्याने तेथील कर्मचाऱ्यांना दिला असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

तरुणीने त्याला टाळायचा प्रयत्न केला असताना एकदा त्याने तिला जबरदस्तीने किस करण्याचा देखील प्रयत्न केला. फिर्यादीचे लग्न इतर मुलाबरोबर ठरल्यावर आपला सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करेल आणि नवरा मुलाला पाठवेल, अशी धमकी तो तिला देऊ लागला. तरुणी कमावती असल्याने एकदा तिला जबरदस्तीने 7500 रुपये पाठविण्यास सांगितले आणि असेच आणखी एकदा वैभवचा भाऊ रोशन याने तिला भेटून वैभवला नवीन फोन घेऊन दे असे सांगत जबरदस्तीने 14 हजाराचा फोन घ्यायला लावला. वैभव हा सध्या कोणतेच काम करत नाही तर रोशन हा सीओईपी महाविद्यालयात इंजिनिअरींगचे शिक्षण घेतो. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.


शेअर करा