केतकी चितळे हिला उच्च न्यायालयाकडून ‘ मोठा ‘ दिलासा

शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमांवर आक्षेपार्ह कविता पोस्ट केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला असून तिच्यावरील तसेच निखिल भांबरे या तरुणावरील विविध ठिकाणी दाखल करण्यात आलेले गुन्हे एकत्रित करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिलेली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह कविता फेसबुक अकाउंटवर पोस्ट केली होती तसेच त्यानंतर तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात स्वप्नील नेटके नावाच्या तरुणाने तक्रार नोंदवली आणि केतकी चितळे हिला 14 मे रोजी राहत्या घरातून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. तिच्याविरोधात आत्तापर्यंत तब्बल 22 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून शरद पवार यांना सोशल मीडियावर धमकी दिल्याप्रकरणी दुसरा तरुण निखिल भांबरे याच्या विरोधात देखील सहा गुन्हे दाखल आहे.

पहिल्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झाल्यानंतर इतर गुन्ह्यात अटकेची कारवाई सरकार करणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर केतकी चितळे आणि निखिल भांबरे यांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि याच वेळी सर्व गुन्हे एकत्रित करण्याची मागणी केलेली होती . या याचिकेवर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची दखल घेत खंडपीठाने सर्व गुन्हे एकत्रित करण्याचे आदेश दिले आहेत.


शेअर करा