विवाहित असूनही ‘ तसल्या ‘ आशेपोटी तरुण पोहचला एका खोलीवर मात्र पुढे घडले असे काही ?

शेअर करा

दोघांमध्ये आधी बराच काळ ऐपच्या माध्यमातून बोलणे झालेले असल्याने त्याला कसली भीती वाटत नव्हती म्हणून तो त्याने सांगितलेल्या पत्त्यावर तो अगदी वेळेवर पोहचला होता मात्र पुढे काय घडेल याची त्याने कल्पनाच केली नव्हती. समलैंगिक संबंध ठेवण्याच्या हव्यासापोटी त्या विवाहित तरुणाने हे धाडस केले होते खरे मात्र त्याला जबरदस्त मारहाण करून त्याच्याकडील ८१ हजार रुपयांचा ऐवज आणि दागिने लुटून नेल्याचा प्रकार पुणे येथील सिंहगड रोड इथे घडला असून याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा एका गे ऐप वर चॅट करत असताना त्याला रवी नावाच्या एकाने हाय मेसेज पाठविल आणि त्यानंतर त्यांच्यात बोलणे सुरु झाले आणि त्याने फिर्यादी तरुणाला एका ठिकाणी भेटायचे ठरवले. भेटण्यासाठी त्यांना बराच काळ जागा मिळत नव्हती मात्र समोरील व्यक्तीने पीडित तरुणाला आता जागेची सोय झाली असून धायरी येथील डीएसके विश्व ते नांदेड फाटा दरम्यानच्या एका खोलीत ९ ऑगस्टला त्याला भेटण्यासाठी बोलावले.

फिर्यादी तरुण इथे पोहचला असता तिथे त्याला रवी नामक इसम भेटला खरा मात्र त्याच्यासोबत आणखी तिघे जण त्या खोलीत शिरले आणि ते दोघे जण एकत्र असताना त्यांनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी, दांडक्याने आणि तलवारीने मारहाण केली. त्या दोघांच्या तसल्या कृत्याचा व्हिडीओ देखील बनवला आणि तो व्हिडीओ व्यायरल करण्याची धमकी देत त्यांनी पीडित तरुणाकडील सर्व पैसे, सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीच्या दोन अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या. त्यानंतर त्यांनी गुगल पे द्वारे व एटीएमचा पिन नंबर जबरदस्तीने घेऊन त्याद्वारे पैसे काढून ८१ हजार रुपयांचा ऐवज देखील लुटून नेला.

काही वेळानंतर तो तरुण तेथून कशीबशी सुटका करून बाहेर पडला मात्र ही बाब घरात समजल्यास आपला संसार मोडेल, या भितीने हा पीडित गप्प राहिला मात्र झालेली फसवणूक देखील त्याच्या जिव्हारी लागली होती त्यातून त्याने ही गोष्ट त्याच्या जवळच्या मित्राला सांगितली आणि मित्राने धीर दिल्यानंतर त्याने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गे अ‍ॅपच्या माध्यमातून कट रचून, मारहाण करुन लुटल्याचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरुन आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे सिंहगड रोड पोलिसांनी सांगितले आहे.


शेअर करा