श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणावर विखे पाटील म्हणाले..

शेअर करा

श्रीरामपूर येथील गाजलेल्या अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला असून ‘ अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करून अत्याचार झालेले प्रकरण ही समाजाला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकाराच्या विरोधात तरुणांनी पुढाकार घेऊन अशी काही प्रकरणे असतील तर मला कळवा. तुमचे नाव गुप्त ठेवून मात्र गुन्हेगारांना पोलिसांच्या मार्फत कारवाई करून धडा शिकवू ,’ असे म्हटलेले आहे.

श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘ अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी अल्पवयीन मुलींचे धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात गुन्हेगारांना बेड्या ठोकून अशीच अनेक प्रकरणे उघडकीस आणलेली आहेत. धार्मिक भूमी असलेल्या शिर्डीत काही गुन्हेगार व्यसनासाठी व्हाइटनर पितात हे देखील मला एका बैठकीत समजलेले असून एका महिन्यात गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई झालेली आपल्याला दिसणार आहे. ‘. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याप्रकरणी सूचना दिल्याचे देखील त्यांनी सांगितले असून चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील सोडले जाणार नाही असे देखील ठणकावले आहे.


शेअर करा