सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेल विक्रेत्यांना नव्याने आदेश जारी

शेअर करा

महाराष्ट्रात सर्वत्र बाटली आणि कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीस प्रतिबंध घालण्याचे आदेश पहिल्यापासून आहेत मात्र पुन्हा एकदा नव्याने हे आदेश नगर जिल्ह्यात जारी करण्यात आलेले आहेत.सर्व पेट्रोल पंप चालक यांना या संदर्भात पुरवठा अधिकाऱ्यांनी पत्र पाठवलेले आहे.

राज्यात सध्या सणासुदीचे वातावरण असून गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर जातीयता तणावाच्या दृष्टीने कुठली अप्रिय घटना होऊ नये या उद्देशाने हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. गणेशोत्सव सुरू असताना एखादा विघ्नसंतोषी व्यक्ती सुटे पेट्रोल आणि डिझेल घेऊन त्याचा गैरवापर करण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व पेट्रोल आणि डिझेल विक्रेते यांनी प्लास्टिक बाटली किंवा कॅन यामध्ये पेट्रोल-डिझेलची विक्री करू नये असे सांगण्यात आले आहे.


शेअर करा