‘ तुमच्या सुनेनंच मला रात्री बोलावलं होत ‘ असे तो ओरडून सांगत होता मात्र ..: कुठे घडली घटना ?

  • by

लॉकडाऊनमध्ये अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींचे चांगलेच हाल झाले असून यामुळे अनेक धक्कादायक अशी प्रकरणे देखील उघडकीस देखील आली आहेत. नुकतेच बिहार मधले एक विवाहबाह्य प्रेमप्रकरण उघडकीस आले असून यात चक्क चार मुलांची आई असलेल्या आपल्या प्रेयसीस तिचा प्रियकर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सासरच्या घरी भेटायला आला खरा मात्र महिलेच्या सासरच्यांनी त्याला इतकी अमानुष मारहाण केली की गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, बिहारच्या गोपालगंज परिसरातील मुर्गीया गावातील घटना असून सदर महिलेच्या वर्तणुकीची सासरच्यांना शंका असल्याने ते लक्ष ठेवून होतेच अशातच रात्रीच्या अंधारात तिचा प्रियकर तिला भेटायला सासरच्या घरी पोहोचला. दोघांचा प्रेमालाप रंगात आलेला असतानाच महिलेच्या सासरच्यांनी प्रियकरासोबत तिला बेडरूममध्ये रंगेहाथ पकडले. यानंतर त्यांनी प्रियकराला रस्त्यावर ओढले आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली. ‘तुमच्या सुनेनेच मला भेटायला बोलावलं होत’ असे तो ओरडून सांगत होता मात्र सासरच्या मंडळींनी त्याची जबरदस्त धुलाई सुरूच ठेवली होती.

मारहाण होत असल्याने तो ओरडू लागला असताना आजूबाजूचे लोक देखील जमा झाले आणि जमावाने देखील त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.मात्र एवढे करून देखील त्यांचे समाधान झाले नाही .सासरच्यांनी तरूणाला आपल्या घराबाहेर खेचले आणि त्याचे कपडे काढून नग्न केले.नग्न केल्यानंतर सासरच्या सदस्यांनी त्या युवकाच्या पायाला दोरी बांधून त्याला अनेक किलोमीटरपर्यंत खेचत नेले.

सासरच्या मंडळींचा हा अमानुषपणा पाहून गावातील काही ज्येष्ठ लोक जमले आणि काही ज्येष्ठ ग्रामस्थांच्या सांगण्यावरून जमावाने आरोपी प्रियकराला सोडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्या युवकाचा जीव वाचवला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.तरूण भेटायला आलेली विवाहित महिला चार मुलांची आई आहे. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिका्यांनी या घटनेसंदर्भात कोणतेही विधान करण्यास नकार दिला.