नगर ब्रेकिंग..पोलीस मुख्यालयापासून काही फुटांवर ‘ होंडा सिटी ‘ अन गाडीत अर्धनग्न तरुण

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून नगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. गुन्हेगारांना आता कसलेच भय न राहिल्याचे दिसून येत असून जिल्हा पोलीस मुख्यालय असलेल्या डीएसपी चौकापासून अवघ्या काही फुटांवर असलेल्या तारकपूर परिसरात पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी कारची दहशत पसरलेली असून पोलिसांची गस्त चार वाजता संपल्यानंतर होंडा सिटी गाडीत दोन तरुण रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना अडवून दमदाटी करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गाडीला समोरील बाजूला नंबरप्लेट आहे तर पाठीमागील बाजूला नंबर प्लेटच अस्तित्वात नाही. गाडीला समोरच्या बाजूला लावलेली नंबर प्लेट हीदेखील डुप्लीकेट असल्याचा अंदाज आहे.

काय आहे प्रकरण ?

डीएसपी चौकापासून अवघ्या काही फुटांवर असलेल्या तारकपूर स्टॅन्ड परिसरात पहाटे चार वाजता पोलिसांची गस्त संपल्यानंतर एक होंडा सिटी गाडी त्यामध्ये दोन तरुण त्यातील एक ड्रायव्हर सीटवर अर्धनग्न अवस्थेत बसलेला तर दुसऱ्या बाजूला त्याचा मित्र परिसरात तिथून जाणाऱ्या नागरिकांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवतात आणि त्यानंतर किरकोळ कारणावरून जीवे मारण्याची धमकी देतात. सदर प्रकार रस्ता लुटीच्या उद्देशाने करण्यात येत असून पोलिसांना या प्रकाराची कल्पना देऊनही अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

गाडीतील तरुण हे उच्चभ्रू कुटुंबातील दिसत असून त्यातील एक साधारण एकवीस वर्षे वयाचा असा असून त्याच्या मित्राचे वय पंचवीसच्या आसपास आहे. पोलिसांची गस्त संपल्यानंतर हे दोघे गाडी घेऊन मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत नागरिकांना अडवत त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देतात . मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणांच्या गाडीला समोरील बाजूला फक्त नंबर प्लेट आहे तर पाठीमागे नंबर प्लेट अस्तित्वात नाही त्यामुळे समोरील बाजूला नंबरप्लेट असल्याने गाडी अडवली जात नाही आणि पाठीमागे नंबरप्लेट नसल्याने अडवण्याच्या आधीच ते फरार झालेले असतात.

नगर येथील एका नागरिकाला अशाच पद्धतीचा अनुभव आल्यानंतर 112 नंबरवर संपर्क करून यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली होती त्यानंतर तेवीस मिनिटात तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी ज्या ठिकाणाहून तक्रार दिली त्या ठिकाणी पोहोचले होते मात्र तोपर्यंत त्या गाडीने पलायन केले होते . परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्यांचा शोध घेऊन या दोन तरुणांना ताब्यात घेतल्यास मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांची उकल होऊ शकेल असा अंदाज आहे. गाडीच्या समोरील बाजूला लावलेली नंबर प्लेट ही अहमदनगर जिल्हा पासिंगची नसल्याने गाडीतील तरुण मद्यधुंद अवस्थेत दहशत निर्माण करून रस्ता लुटीच्या उद्देशाने ते हा प्रकार करत असण्याची शक्यता आहे. महागडी गाडी वापरल्याने आपल्यावर कोणाचा संशय येणार नाही यामुळे कदाचित इतरही अनेक गुन्हे करण्यासाठी या गाडीचा वापर केला जात असल्याची शक्यता आहे.

तारकपूर बस स्टॅन्डपासून लालटाकीपर्यंत या दोन जणांनी होंडा सिटी कारचा वापर करत धुमाकूळ घातलेला असून त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.पोलिसात गेल्यावर आपलीच चौकशी होईल या भीतीने नागरिक बोलत नसल्याने यांचे फावत आहे .तारकपूर बसस्टँडजवळील राधाबाई काळे महाविद्यालय , पेमराज सारडा महाविद्यालय , न्यू आर्टस् महाविद्यालय तसेच प्रोफेसर कॉलनी चौकातील वेगवेगळे क्लासेस येथे पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात तरुणांची तरुणांची गर्दी असते. तारकपूर बस स्टॅन्ड येथूनही रोज ये-जा करणारे ग्रामीण भागातील अनेक तरुण तरुणी या रस्त्याने प्रवास करतात अशा परिस्थितीत नगरमध्ये मद्यधुंद या अवस्थेतील तरुणांकडून ‘ निर्भया ‘ सारखे प्रकरण होण्याची देखील शक्यता असल्याने त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. जोपर्यंत गुन्हा होत नाही तोपर्यंत पोलिसांनाही असे प्रकार गांभीर्याने घ्यावेसे वाटत नसल्याने नागरिकांमध्ये दहशत कायम आहे.


शेअर करा