श्रीरामपूरमधील दीपक बर्डेचा अद्यापही शोध लागेना , पाच जण ताब्यात घेऊनही ?

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे उघडकीला आली होती. भोकर येथील एका तरुणाच्या अपहरणप्रकरणी पाच जणांच्या विरोधात तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यातील चार जणांना आधी अटक करण्यात आली होती तर एक जण मात्र पोलिसांच्या ताब्यात आलेला नव्हता त्यालाही अटक करण्यात आली असून राजू शेख असे त्याचे नाव असल्याचे समजते. अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचा देखील अद्याप शोध लागलेला नसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. ह्या घटनेला सात दिवस होऊन गेले असून अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीला शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

उपलब्ध माहितीनुसार, रावसाहेब दादा बर्डे यांनी या प्रकरणी फिर्याद दिलेली असून त्यांचा मुलगा दीपक हा कामाच्या शोधासाठी 30 ऑगस्ट रोजी पुणे येथे गेला होता. पुण्यात पोहचल्याचे त्याने फोनवर रावसाहेब बर्डे यांना सांगितले मात्र त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मजनू शेख नावाच्या व्यक्तीने त्याच्या मेहुण्याला पुढे करून दीपक याला वाघोली येथे बंद करून ठेवल्याचे गावातील दोन व्यक्तींनी रावसाहेब बर्डे यांना सांगितले. दीपक हा त्याचा मित्र संजय उमप याच्यासोबत नाश्ता करत असताना खून करण्याच्या उद्देशाने त्याचे मजनु शेख, समीर शेख आणि अजीज शेख यांनी अपहरण केले त्यानंतर दीपक याला भोकर येथे आणून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तो गायब झाला असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी इम्रान शेख, मजनु शेख, समीर शेख, अजीज शेख, राजू बबन शेख ( सर्वजण राहणार भोकर तालुका श्रीरामपूर ) यांच्याविरोधात अपहरण तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. जिल्हा पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके याप्रकरणी तपास करत असून आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी परिचित असलेले संदीप मिटके यांनी अवघ्या काही तासांच्या आत पाच आरोपींना अटक केली आहे.आपला मुलगा दिपक याचा घातपात झाल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केलेला असून पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहेत. आंतरजातीय विवाह केल्याने दीपक बर्डे याचे अपहरण करण्यात आल्याचा संशय असून भिल्ल बांधवांतर्फे लवकरात लवकर दीपक याचा शोध लावण्याचे आवाहन पोलिसांना करण्यात आले आहे .


शेअर करा