सुजय विखे यांच्या ‘ त्या ‘ वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण : पहा काय म्हणाले ?

शेअर करा

नगरचे खासदार सुजय विखे हे नेहमी आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून चर्चेत असतात . कोरोनाच्या लढाईत विरोधी पक्षात असून देखील सुजय विखे यांनी मतदारसंघात भरीव काम केलेले आहे , मात्र आता सुजय विखे वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत . कर्जत तालुक्यातील राशीन येथे करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना ‘मागील निवडणुकीत शिवसेना आमच्यासोबत होती. नंतर सत्तेसाठी ते आम्हाला सोडून गेले. मलाही डावलले गेले तर वेगळा निर्णय घ्यायला मीही मोकळा आहे,’ असे विधान सुजय विखे यांनी केले आणि नव्या राजकीय चर्चेला उधाण आले.

खासदार डॉ. सुजय विखे हे राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र असून त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची आशा संपताच भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि ते विक्रमी मतांनी निवडून देखील आले होते . सुजय विखे यांनी संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्ये याआधी देखील केलेली आहेत. मात्र ह्या नवीन वक्तव्यानंतर त्यांनी लगेचच पुन्हा ‘ मी ते विधान गमतीने केले होते’, असे सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्नही केला, मात्र तोवर विखे पुन्हा विखे पुन्हा पक्षांतराच्या तयारीत आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली.

विखे यांनी ह्या वक्तव्यावर खुलासा करताना सांगितले, ” मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास्त करण्यात आला आहे. बैठकीच्या वातावरणात तणाव होता. एक डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय कार्यकर्त्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी मी काही गमतीदार विधाने केली होती, गंमत म्हणून आणि एकंदरीतच जीवनातील अनिश्चिततेकडे बोट दाखवताना मी स्वत:चे उदाहरण दिले. मी शिक्षणाने आणि व्यवसायाने डॉक्टर आहे. राजकारणात येऊन आणि पक्षांतर करून खासदार होईन, असा विचारही मी कधी केला नव्हता. मात्र, आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काही वेळेस निर्णय घ्यावे लागतात. तशाच प्रकारे करोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील, असे मला सुचवायचे होते. माझ्या म्हणण्याचा राजकीय अर्थ काढला गेला. यासारखे दुर्दैव नाही “

विखे कुटुंबीयांचा संगमनेर येथील थोरात लॉबी आणि बारामतीतील पवार लॉबी यांच्याशी राजकीय संघर्ष जुना राहिलेला आहे . सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विखे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये जातील याची शक्यता खूप कमी आहे .

संबंधित बातम्या

” तेव्हा ” काळ्या चड्ड्या बनियन घालून आंदोलन केलं असत तर महाराष्ट्राने पाठ थोपटली असती : संजय राऊत
https://nagarchaufer.com/?p=59

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या हातात ‘ फडणवीस हटाव ‘ चा फलक ? : जाणून घ्या काय आहे वस्तुस्थिती
https://nagarchaufer.com/?p=62

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घेतलाय योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच समाचार : पहा काय म्हणाले ?
https://nagarchaufer.com/?p=154

आरती कीजै नरेन्द्र ललाकी म्हणत नरेंद्र मोदींची आरती झाली लाँच…काय आहेत आरतीचे बोल ?
https://nagarchaufer.com/?p=103

अंकल..तुम्ही आदराच्या लायकीचेच नाही, स्वरा भास्करच्या निशाण्यावर कोण ?
https://nagarchaufer.com/?p=123

लॉकडाऊनचे नियम फाट्यावर मारत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार खेळले क्रिकेट : व्हिडीओ व्हायरल
https://nagarchaufer.com/?p=142


शेअर करा