आश्रमशाळेतील पास्टरकडून लैंगिक छळ , आणखी तीन मुली आल्या समोर

शेअर करा

एक महिन्यापूर्वी नवी मुंबई परिसरातील सीवूड येथील एका चर्चमध्ये बेकायदा पद्धतीने आश्रम शाळा सुरू असल्याचे प्रकरण समोर आले होते .आश्रमशाळेतील पास्टर राजकुमार येशुदासन याने आणखी तीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीच्या आश्रम शाळेतून सुटका करण्यात आल्यानंतर मुलींनी याप्रकरणी माहिती दिली आहे.

ठाणे जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागाने पास्टर राजकुमार येशुदासन याच्या विरोधात आता आणखी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केलेले आहे. विनयभंग आणि पॉक्सो या कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आश्रम शाळेत कुणाचे लैंगिक शोषण झालेले नाही असे पत्रकार परिषद घेऊन फाउंडेशनकडून सांगण्यात आले होते मात्र त्यांचा हा दावा फोल ठरलेला आहे.

बेथेल गॉस्पेल नावाच्या एका चर्चमध्ये बेकायदा पद्धतीने ही आश्रम शाळा सुरू होती. तिथे अल्पवयीन मुले आणि मुले यांचा पास्टर राजकुमार येशुदासन हा छळ करत असल्याची माहिती समजल्यानंतर ठाणे जिल्हा आणि महिला बालकल्याण समितीने पाच ऑगस्ट रोजी या चर्चेवर कारवाई करत तिथून तब्बल 45 मुलामुलींची सुटका केली होती त्यानंतर काही मुलींनी या आश्रमामध्ये पास्टर आपला लैंगिक छळ करत होते असे सांगितलेले आहे.

सुटका करण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलीने याप्रकरणी माहिती दिली असून आरोपी राजकुमार हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. राजस्थानमधील उदयपूर येथून या आश्रमात आलेल्या 13 आणि 14 वर्षाच्या दोन्ही बहिणींनी त्याचप्रमाणे आणखी एका दहा वर्षीय मुलीने आरोपीच्या विरोधात तक्रार दिली असून एनआरआय पोलीस ठाण्यात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी स्वतः तक्रार देऊन लैंगिक शोषणाचे तीन गुन्हे आरोपीच्या विरोधात नोंदविण्यात आलेले आहेत.


शेअर करा