सोशल मीडियावर ‘ हा ‘ व्हिडीओ पाहून लग्नाळू तरुण भडकले , काळजाचा ठाव घेणारे शब्द

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नवीनच लग्न झालेल्या या जोडप्याच्या व्हिडिओची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. अनेक लग्नाळु तरुण या व्हिडिओवर संताप व्यक्त करत असून त्यांच्या संतापाचे कारण म्हणजे नवरदेव आणि नवरी यांच्या वयातील फरक आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अडचणीत सापडलेने लग्नाळू तरुण या जोडप्यावर संताप व्यक्त करत आहे तर काहीजण या व्हिडिओचे कौतुक देखील करत आहे. नवरा आणि नवरी यांच्यामध्ये थोडाफारच वयात फरक असतो. काही जोडप्यात खूपच जास्त फरक असल्यानंतर हे विवाह चर्चेचा विषय होऊन जातात. जुन्या काळात असे विवाह होत होते मात्र आता सध्या फार फार तर पाच वर्षापासून तर आठ वर्षापर्यंत फरकच नवीन जोडप्यात आढळून येतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जुन्या काळातील आठवणी पुन्हा एकदा जागृत झाल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडिओच्या सुरुवातीला एक अतिशय सुंदर अशी नवरी बसलेली असून ती अत्यंत आनंदी दिसून येत आहे. तिच्या शेजारी बसलेल्या वृद्ध व्यक्तीला ती ‘ आय लव यू ‘ म्हणताना दिसते. भर लग्नातच प्रपोज अनेकजणांच्या काळजाचा ठाव घेऊन गेलेले आहे. शेजारील व्यक्ती हा तिचा नवरा असून त्याच्या शेजारी बसून ती रोमँटिकपणे आपले प्रेम व्यक्त करते. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप पर्यंत समोर आले नसून वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया या व्हिडिओला येत आहेत.


शेअर करा