श्रीरामपूरच्या दीपक बर्डेचा अखेर खून झाल्याचे समोर , मुस्लिम मुलीशी लग्न केले अन नराधमांनी…

शेअर करा

मुस्लिम मुलीशी लग्न केले म्हणून अपहरण करण्यात आलेल्या दीपक बर्डे या हिंदू भिल्ल समाजातील युवकाचा ३१ ऑगस्टला आरोपींनी खून केल्याची माहिती तपासात समोर आली असून आरोपींना बोलते करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. नितेश राणे यांनी सदर तरुणाचा शोध लागत नसल्याने श्रीरामपूर इथे मोर्चाही काढलेला होता.

आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला असून अद्यापपर्यंत मृतदेहाचा शोध लागलेला नाही. अटकेत असलेल्या आरोपींकडून तपासात ही माहिती पुढे आल्याचे श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले असून पोलिसांनी पुरावे जमवण्यास सुरुवात केली आहे. संशयित आरोपींना विक्रमी वेळेत पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी बेड्या ठोकल्या होत्या मात्र आरोपीकडून खुनाची कबुली वदवून घेण्यात मात्र पोलिसांना उशीर झाला आहे .

श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी मजून शेख, इम्रान अब्बास शेख, समीर अहमद शेख, अजिज शेख यांना अटक केली होती . पोलीस तपासात आरोपींनी ३१ ऑगस्ट रोजीच दीपक यास बेदम मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला असे समोर आले आहे त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला, अशी माहिती आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे. जिल्ह्यासह राज्यात या ‘ ऑनर किलिंग ‘ ने खळबळ उडालेली आहे. दोघेही सज्ञान असल्याने त्यांनी विवाह केला होता मात्र त्यांचा हा विवाह बुरसटलेल्या विचाराच्या नातलग आणि कुटुंबियांना पचवता आला नाही आणि त्यांनी हे कृत्य केले .

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील भिल्ल समाजातील दीपक बर्डे याचे एका मुस्लिम युवतीसोबत प्रेम होते. मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता मात्र तरीही त्या दोघांनी परस्पर लग्न केले. मुलीच्या घरच्यांना हे कळल्यावर त्यांनी दीपकला मारहाण केली आणि त्याच्या ताब्यातून त्या मुलीला घेऊन गेले आणि त्यांनी तिला पुण्याला आपल्या मामाकडे ठेवले. याची माहिती मिळाल्यावर दीपक दुसऱ्या कामाच्या निमित्ताने मित्रांसोबत पुण्याला गेला तो पुन्हा आलाच नाही. मुलीच्या मामाने दीपकला मारहाण करत अपहरण केले, असा आरोप त्याच्या मित्रांनी केला असून त्याचा घातपात झाल्याचा संशय आधीच व्यक्त करण्यात आला होता. श्रीरामपूर इथे एका लव्ह जिहाद प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात होते.


शेअर करा