गूढ उलगडले..स्वप्नाली सावंत यांचा मारेकरी निघाला इतका जवळचा की ?

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून रत्नागिरी येथील दहा दिवस गायब असलेल्या रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा त्यांच्या पतीनेच खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यांचा आधी गळा दाबून खून करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना जाळून टाकण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, शिवसेना उपतालुका प्रमुख सुकांत गजानन सावंत ( वय 47 ) , त्याचा चुलत भाऊ रुपेश कमलाकर सावंत ( वय 43 ) आणि कामगार प्रमोद बाबू गावणंग (वय ३३ ) यांना रविवारी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. स्वप्नाली सावंत या एक सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्याच पतीने पोलिसात दिलेली होती.

पोलीस तपास सुरू असताना स्वप्नाली यांची आई यांनी या प्रकरणी घटनेमागे आरोपींवर संशय व्यक्त केलेला होता त्यानंतर पोलिसांनी सुकांत याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. स्वप्नाली हि सुकांत याची दुसरी पत्नी होती. त्यांच्यात वाद सुरू होते आणि प्रकरण न्यायप्रविष्ट होते. स्वप्नाली या गणेश उत्सवासाठी आलेल्या असताना एक सप्टेंबर रोजी त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर सुकांत याने त्याचा चुलत भाऊ आणि एक कामगार यांना मदतीला घेऊन स्वप्नाली यांचा खून केला. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून पोलिस तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा