मला न्याय द्या म्हणत ‘ अश्लील चॅटचे स्क्रिनशॉट आणि पेन ड्राईव्ह ‘ महिलेने चक्क अमित शाह यांना पाठवले

शेअर करा

चित्र : प्रतीकात्मक

देशाचे गृहमंत्री अमित शाह कोरोनावर मात करून नुकतेच पुन्हा कामावर रुजू झालेले असून उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील मूळ गाव असलेल्या एका महिलेने त्यांच्याकडे तिच्या पतीबद्दल एक गंभीर तक्रार केली असून त्यात अमित शाह यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे .

सदर महिला ही आयपीएस अधिकाऱ्याची पत्नी असून स्वतः देखील दिल्लीत अधिकारी पदावर कार्यरत आहे . महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या नवऱ्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असून पती सातत्याने या महिलांशी अश्लिल बोलतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सदर महिलेने अमित शाह यांच्याकडे केली आहे .

आपल्या सगळ्या तक्रारी ह्या तिने चार पानी पत्र लिहून कळवल्या आहेत तर आपल्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी तिने पतीच्या महिलांसोबत अश्लील संभाषणाचे ५० पेक्षा जास्त चर्चेचे स्क्रिनशॉट्स पाठवले आहेत. याशिवाय महिलेने पेन ड्राईव्हमध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या संभाषणाचा व्हिडिओही अमित शहा यांना पाठविला आहे. आपल्या बाहेरख्याली पतीवर कारवाई करण्यासाठी या पत्राची एक प्रत तिने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि डीजीपी यांनाही पाठविली आहे.

पत्नीच्या म्हणण्यानुसार, ” अधिकाऱ्यासोबत तिच लग्न २०१४ मध्ये झालं होतं. लग्नानंतर तिचा नवरा झांसी, एटा, अयोध्या आणि मेरठ अशा अनेक शहरांमध्ये कार्यरत होता आणि येथेच त्याने प्रत्येक शहरात वेगवेगळ्या महिलांशी संबंध निर्माण केले. मध्य प्रदेशच्या सीमेवर नवरा कार्यरत असताना एक १८ वर्षीय मुलगी आपल्या आईवडिलांसोबत एका केसच्या निमित्ताने एस.पी.( पौलीस अधिक्षक कार्यालय ) ऑफिसमध्ये आली होती. त्या दरम्यान, या दोघांची ओळख झाली. हळूहळू त्यांचे संबंध वाढत गेले. महिलेने आयपीएस पतीची ही चूक अनेक वेळा पकडली गेली परंतु कुटुंबासमोर त्याने आपली चूक मान्य करून लेखी माफी मागितली. तिचा नवरा सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहे आणि तपास एजन्सीच्या मुख्यालयात पोस्टवर कार्यरत आहे “

सदर महिलेचा नवरा लखनऊचा रहिवासी असून तो २००९ बॅचचा आयपीएस अधिकारी आहे. सध्या एका घटस्फोटीत महिलेशी आयपीएस पतीने अनैतिक संबंध ठेवले आहेत. लग्नाच्या बहाण्याने त्या महिलेला आपल्यासोबत ठेवलं आहे. त्यामुळे पतीच्या वागणुकीला कंटाळून पत्नीने थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून स्वत:च्या पतीवर गंभीर आरोप करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गृहमंत्री अमित शाह आता ह्या महिलेला कसा न्याय मिळवून देतात ते येत्या काळात पहायला मिळेलच.


शेअर करा