श्रीरामपूर चर्चेतच..मुल्ला कटर प्रकरणात आणखी एक पोलीस कर्मचारी निलंबित

शेअर करा

नगर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला मुल्ला कटर उर्फ इम्रान कुरेशी याला गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी आणखी एका पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याआधी देखील याच प्रकरणात दोन व्यक्तींचे निलंबन करण्यात आल्यानंतर मुल्ला कट्टर याला मदत केल्याप्रकरणी आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आलेली असे असून सुनील दिघे असे या कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे समजते. सुनील दिघे हे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्याच काळात मुल्ला कट्टर प्रकरण उजेडात आले होते.पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुल्ला कटर प्रकरणात फिर्यादी असलेल्या कुटुंबावर पोलीस कर्मचाऱ्यांकडून दबाव येत असल्याचा असल्याचा आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची पीडित कुटुंबाने भेट घेतली होती त्यानंतर सुरुवातीला तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय सानप आणि पोलीस कर्मचारी पंकज गोसावी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती त्यानंतर ही तिसरी कारवाई आहे.

श्रीरामपूरच्या या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली होती . दोषी व्यक्तींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही असे देखील सांगण्यात आले होते. नितेश राणे यांनी श्रीरामपूर येथील दीपक बर्डे या तरुणाचा शोध लागत नसल्याने आंदोलन देखील केले होते.


शेअर करा