‘ दार उघडताच झोंबाझोंबी ‘ , एकनाथ लोमटे बाबाला अटक : काय आहे प्रकरण ?

देशात भोळ्याभाबड्या नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्याचे शोषण करण्यात ‘ बाबा इंडस्ट्री ‘ पटाईत झालेली आहे. असेच एक प्रकरण काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे समोर आले होते. एका भाविक असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी फरार असलेला एकनाथ लोमटे महाराज यास अखेर अटक करण्यात आलेली आहे. तब्बल 45 दिवसांनी ही अटक झालेली असून पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

उपलब्ध माहितीनुसार, आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने लोमटे महाराज याने एका महिलेचा विनयभंग केला असे महिलेचे म्हणणे असून पोलिसात तक्रार देण्यात आल्यानंतर हा बाबा फरार झालेला होता. 45 दिवसांनी कळंब पोलिसांनी अखेर त्याला अटक केली केली असून आपल्यामध्ये दैवी शक्ती आहे असे या बाबाच्या भक्तांचे म्हणणे आहे. कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराज याचा एक मोठा मठ असून आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती बरे करतात असा दावा त्यांचे असंख्य भक्त करतात. अनेक बड्या पक्षांचे नेते देखील या बाबांचे भक्त असून आरोपी पीडित महिला ही देखील या बाबांची भक्त होती.

लोमटे महाराज याच्याविरोधात याआधी देखील भोंदूगिरी सारखे गुन्हे दाखल झालेले आहेत. एक महिला दर्शनासाठी आली असताना लोमटे महाराजांनी तिचा विनयभंग केला आणि त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर तिचे शोषण केले असे पीडित महिलेचे म्हणणे आहे . महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लोमटे महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतर तो लगेच फरार झालेला होता मात्र अखेर त्याला पकडण्यात आलेले आहे

काय आहे प्रकरण ?

बीड येथील एक 35 वर्षीय महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथील महाराज एकनाथ लोमटे यांची भक्त होती. मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेलेले असताना गुरुवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती म्हणून ती झाडाखाली बसून राहिली. दरम्यानच्या काळात महाराजांचे जेवण सुरु होते. काही वेळाने या महाराजांचा एक शिष्य याने महिलेला महाराजांनी तुम्हाला खोलीत बोलावले आहे असे सांगितल्यानंतर महिला महाराजांच्या खोलीत पोहोचली.

महिला खोलीत आल्याचे दिसल्यानंतर महाराज यांनी तिला शारीरिक संबंध ठेवावे लागतील अन्यथा तुझी पेढा खाल्ल्यानंतर बनवलेली अश्लील क्लिप व्हायरल करू अशी तिला धमकी दिली. तिने विरोध केला असता महाराजांनी तिच्यासोबत झोंबाझोंबी आणि मारहाण केली असेदेखील महिलेचे म्हणणे आहे. आतमध्ये आरडाओरडा झाल्यानंतर शिष्याने दार उघडले त्यावेळी महाराजांनी मारहाण करून आपला गळा दाबण्याचा प्रयत्न केला असे महिलेचे म्हणणे असून पोलिसांनी तिच्या म्हणण्यावरून शुक्रवारी पहाटे एकनाथ लोमटे या महाराजावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला होता मात्र गुन्हा दाखल होताच बाबा फरार झालेला होता.