कुंपणानेच खाल्लं शेत…पोलिसानेच सराफा व्यावसायिकाला अडवून भर चौकात लुटले

शेअर करा

औरंगाबाद पोलिस दलात खळबळ उडवून देणारा एक प्रकार समोर आलेला असून एका पोलिस कर्मचाऱ्याने चक्क एका सराफा व्यापाऱ्याला लुबाडण्याचा प्रकार केलेला आहे. औरंगाबाद शहर हद्दीतील सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका कर्मचार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संतोष वाघ ( सोयगाव पोलीस ठाणे ) आणि रामचंद्र दहिवाळ ( राहणार शेंद्रा औरंगाबाद ) अशी आरोपींची नावे असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, रामचंद्र दहिवाळ हे सराफा व्यापारी असून परिसरातील अनेक इतर व्यापाऱ्यांशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. आरोपी संतोष वाघ आणि त्यांची देखील चांगली ओळख असल्याने दोघांनी मिळून एका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्लॅन केलेला होता. रामचंद्र दहिवाळ याने आणखीन एक सराफा व्यापारी असलेले अशोक जगन्नाथ विसपुते ( वय ५३ वर्ष राहणार जळगाव ) यांना सोने दाखवण्याच्या बहाण्याने औरंगाबाद येथे बोलावून घेतले होते. सराफा व्यापारी असलेले अशोक जगन्नाथ विसपुते हे रामचंद्र दहिवाळ यांच्यावर विश्वास ठेवून सोने घेऊन औरंगाबाद इथे आले.

अशोक विसपुते औरंगाबाद इथे आल्यानंतर त्यांची लूट करण्याचा प्लॅन आधीपासूनच संतोष वाघ आणि रामचंद्र दहिवाळ यांनी ठरवलेला होता. ठरलेल्या प्लॅन प्रमाणे अशोक विसपुते आल्यानंतर आणि दहिवाळ याने याने यांची भेट घेतली आणि सोन्याची पाहणी केली मात्र आपला काही व्यवहार होणे शक्य नाही असे सांगत तिथून काढता पाय घेतला त्यानंतर पोलीस कर्मचारी असलेला संतोष वाघ याने अशोक विसपुते यांना केंब्रिज चौकात अडवले.

‘ तुम्ही कुठे जात आहात गाडी आधी बाजूला घ्या ‘ असे सांगत संतोष वाघ याने त्यांना अडवले आणि आपण पोलिस आहोत म्हणून चौकशी करण्याच्या उद्देशाने त्याने गाडीमध्ये आत येऊन होऊन तपासणी करण्याचा प्रकार केला आणि त्यानंतर 26 तोळे सोने आणि गाडीतील साडेआठ लाख रुपये घेऊन पलायन केले. अशोक विसपुते यांनी त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संतोष वाघ व रामचंद्र दहिवाळ यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरु असल्याचे समजते.


शेअर करा