भावजयीच्या हातावर नणंदेच्या नावाचा टैटू , लग्न झाल्यावरही नांदण्यास नकार अन एके दिवशी ?

नणंद आणि भावजय यांच्यातील नाते तसे अत्यंत जवळचे असते मात्र अनेकदा मान अपमान यावरून त्यांच्यात वाद होतात मात्र क्वचित प्रसंगी त्यांच्यात चांगले संबंध देखील असतात. अशीच एक घटना समोर आली असून मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात रक्षाबंधनच्या दिवशी दोघींनी एकमेकीला राखी बांधून आपले आयुष्य संपवलेले आहे.

मध्यप्रदेशातील दतिया जिल्ह्यातील भांडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीला आलेली असून बडेरा गावात तीस वर्षे भावजयी असलेली पूनम आणि बावीस वर्षीय नणंद मंजू यांचे मृतदेह एका खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. सुरुवातीला हा खुनाचा प्रकार असल्याची चर्चा होती मात्र त्यानंतर तपासामध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

पुनम यांचा पाच वर्षाचा मुलगा खोलीत आला त्यावेळी त्याला आई आणि आत्या पंख्याला लटकलेल्या आढळून आल्या त्यानंतर त्याने टाहो फोडला म्हणून पती आणि नातेवाईक हजर झाले . पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांना खाली उतरवण्यात आले त्यावेळी त्यांचा मृत्यू झालेला होता. पोलीस तपासात त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री असल्याचे समोर आले असून भावजयी असलेल्या महिलेने तिच्या नणंदेचे चक्क स्वतःच्या हातावर गोंदवले होते. भावजयी असलेली पूनम हिच्या पतीला मात्र यांच्यातील हा जिव्हाळा पसंत नव्हता म्हणून त्यांनी एकमेकीला भेटून हा टोकाचा निर्णय घेतला.

पुनम हिचे सात वर्षापूर्वी रामू नावाच्या तरुणासोबत लग्न झालेले होते तर तिची नणंद असलेली मंजू हिचा विवाह अंकित यादव नावाच्या व्यक्तीसोबत चार महिन्यांपूर्वी झालेला होता. मंजु ही नांदायला जायला फारशी उत्सुक नसायची मात्र लग्नानंतर ती गेली तर अवघ्या काही दिवसात ती अनेकदा तिची भावजयी आणि भाऊ यांच्या घरी राहायला यायची अशीही माहिती समोर आलेली आहे. पोलीस सध्या महिलेचा पती आणि सासरच्या मंडळींची चौकशी करून माहिती घेत आहे .