रात्री अकराला महिला पोलीस अंमलदाराकडे ‘ नको ती ‘ मागणी , आरोपी पत्नी पत्नीही पोलिसच

महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ उडवून देणारी एक घटना बीड इथे समोर आलेली असून सहकारी असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला ‘ चक्क माझी इच्छा पूर्ण कर नाहीतर मी फाशी घेईल ‘ अशी धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर घटनेनंतर ‘ पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक ‘ असे म्हणत अंमलदार असलेल्या या व्यक्तीच्या पत्नीने दुसऱ्या महिला अंमलदारास धमकावण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल हरिश्‍चंद्र खताळ आणि पत्नी पोलीस नाईक शिवकन्या अशी आरोपींची नावे असून ते दोघेही पती-पत्नी आहेत. हरिश्चंद्र खताळ यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात सहकारी महिलेने फिर्याद दिली असून त्यामध्ये २०२१ पासून तर ऑगस्ट 2022 पर्यंत हरिश्‍चंद्र खताळ याने ‘ माझ्यासोबत जवळीक कर माझी इच्छा पूर्ण कर ‘ असे म्हणत सहकारी महिलेला व्हाट्सअप मेसेज करून तसेच अश्लील इशारे करून त्रास दिलेला आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्याप्रमाणे, आठ सप्टेंबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास हरिश्चंद्र हा पीडित महिला अंमलदाराच्या घरी आला त्यावेळी त्याने माझी इच्छा पूर्ण कर नाहीतर मी फाशी घेईल असे सांगत धमकावत तिचा विनयभंग केला त्यावेळी त्याच्या पत्नीने ‘ पैसे घेऊन तू प्रकरण आत्ताच्या आता मिटवून टाक नाहीतर तुझ्यावर 306 अंतर्गत गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करेल आणि तुला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही ‘ अशी धमकी दिली.

हरिश्चंद्र खताळ हा महिला अंमलदाराला सातत्याने त्रास देत होता. गेल्या वर्षभरापासून ही पीडित महिला ही त्याचा त्रास सहन करत होती मात्र त्यानंतर त्याने चक्क घरी येऊन पीडित महिलेचा विनयभंग करण्याचा प्रकार केला आणि त्यामध्ये त्याच्या पत्नीने देखील त्याची साथ देत आपल्याला धमकावले असे पीडितेचे म्हणणे असून आरोपी पती-पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.