फ्लॅट बंगला रूम गाळा भाड्याने देताय ? नगर पोलिसांना माहिती देऊन करा सहकार्य

नगर शहरात नोकरी आणि आणि शिक्षणासाठी तसेच व्यवसायासाठी अनेक जण शहरात खोल्या अथवा फ्लॅट गाळे भाड्याने घेऊन राहत आहेत मात्र त्यातील बहुतांश घर मालक किंवा फ्लॅटचे मालक आपल्याकडे कोण राहत आहे याची कुठलीही माहिती पोलिस प्रशासनाला कळवत नाहीत त्यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याची देखील शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने यासंदर्भात वेबसाईटवर एक स्वतंत्र मेनू बनवलेला असून त्यामध्ये आपल्याकडील राहत असलेल्या भाडेकरूची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा पोलिस दलाच्या वेबसाईटवर यासंदर्भात स्वतंत्र एक टॅब उपलब्ध करून दिलेला असून त्यामध्ये भाडेकरूंची ऑनलाईन नोंदणी करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा आणि सुव्यवस्थेला समाजकंटक व्यक्तींकडून धोका होऊ शकतो आणि जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो म्हणून मालक असलेल्या व्यक्तींनी आपल्या भाडेकरूची माहिती पोलिस दलाला द्यावी असे देखील आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

https://ahmednagardistpolice.gov.in/TenantForm?ps_id=0 या लिंकवर क्लिक करून आपण पोलिसांना आपल्याकडे राहत असलेल्या व्यक्तींची माहिती कळवून पोलिसांना सहकार्य करू शकता .