चुकीच्या नात्यात सगळ्या मर्यादा पार , अल्पवयीन मुलगा म्हणतोय की..

शेअर करा

प्रेमात आणि युद्धात सगळ माफ असतं असं म्हटलं जातं मात्र काही गोष्टी अशा असतात की त्या माफ करण्याच्या देखील पलीकडे असतात अशीच एक घटना राजस्थानच्या चूरू जिल्ह्यात उघडकीला आली असून एका मामीचा जीव भाच्यावर जडला आणि तिने त्याच्या प्रेमात सगळ्या मर्यादा पार केल्या. धक्कादायक बाब म्हणजे भाचा हा अल्पवयीन असल्याने तो मामाकडे येत असायचा. दरम्यानच्या काळात पस्तीस वर्षीय मामीचे त्याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. मामाला हा प्रकार समजल्यानंतर खूप उशीर झालेला होता. अखेर प्रकरण पोलिसात गेले त्यावेळी मामाने पत्नी आणि भाच्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली.

पतीने दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी नेशल येथील महिलेचे आपल्यासोबत लग्न झालेले होते. आम्हाला दोन मुले देखील असून आपली बहीण हिचे रंगलाका येथे लग्न झालेले आहे. तिचा मुलगा अल्पवयीन आहे आणि तो आपल्या घरी येत असायचा याचवेळी आपली पत्नी आणि त्याच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आपण त्यांना अनेकदा समजावून सांगितले मात्र त्यांनी ऐकले नाही असे या पतीचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी पत्नीने आपण भाच्यासोबत राहायला जाणार आहोत असे आपल्याला सांगितले तसेच त्याच्यासोबत आपण लग्न देखील केलेले आहे असे देखील ती म्हणाली त्यामुळे आपण आपल्याला मोठा धक्का बसला. आपण आपल्या पत्नीला आतापर्यंत घटस्फोट दिलेला नाही त्यामुळे त्यांनी केलेले लग्न हे कायदेशीर नाही असेही पतीचे म्हणणे आहे.

बहिणीचे कुटुंबीय आणि आपण अनेकदा या दोघांना समजावण्याचा देखील प्रयत्न केला. तुमचे नाते हे चुकीचे आहे असे सांगून देखील ते आम्ही दोघे एकमेकाला सोडणार नाही. सोबतच राहणार आणि एकमेकासोबतच मरणार असे देखील या मामीने सांगितले असून मामासोबत यापुढे संसार करण्यास नकार दिलेला आहे . मामीचे वय 35 वर्षे असून भाच्याचे वय 17 वर्षे आहे. तब्बल 17 वर्षांनी लहान असलेला भाचा यानेदेखील आपण मामीसोबतच यापुढे राहणार आहोत असे सांगितले आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणी सामोपचाराने तोडगा काढा असे सांगत त्यांना घरी पाठवून दिले आहे .


शेअर करा