‘ पहाटे पाचपर्यंत थांब ‘, विवाहित प्रेयसीने आग्रहच धरला अन पहाटेच्या सुमारास..

शेअर करा

एक अत्यंत खळबळजनक अशी घटना देशात समोर आलेली असून पूर्णपणे प्रियकराच्या आहारी गेलेल्या प्रेयसीला अखेर आपल्या जीवाची किंमत मोजावी लागलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही प्रेयसी विवाहित असून तिच्या 19 वर्षीय प्रियकराने तिची हत्या केलेली आहे. मयत प्रेयसीचे वय 35 वर्ष असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार , छत्तीसगड येथील कोरबा जिल्ह्यात हा प्रकार उघडकीला आलेला असून दमदहा परिसरातील रामपूर गावात एका 19 वर्षीय तरुणाचे 35 वर्षीय विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध जुळले होते त्यातून त्यांनी अनेकदा प्रेमाच्या सगळ्या मर्यादा पार केल्या मात्र एका दिवशी रात्री लवकर स्वतःच्या घरी जाण्यावरून त्यांचे वाद झाले आणि त्याने तिची हत्या केली. तिचा नग्न मृतदेह अंगणात लपवण्याचा प्रयत्न केला मात्र याच दरम्यान गावकरी तिथून जात असताना त्यांनी हे पाहिल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.

गावकऱ्यांनी या प्रकाराची पोलिसांना कल्पना दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेची ओळख पटवली त्यावेळी महिलेचा पती कामानिमित्त दुसऱ्या गावी गेलेला होता म्हणून महिलेने तिच्या 19 वर्षे प्रियकराला घरी बोलावले होते. मयत महिलेला तीन मुले देखील असून तिने त्यांना एका खोलीत झोपी लावले आणि त्यानंतर बाहेरून कुलूप लावून घेतले. दोघांनी रात्रभर दारू आणि चिकनची पार्टी केली त्यावेळी आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पहाटेच्या सुमारास प्रियकर असलेल्या तरूणाला घरी जायचे होते मात्र विवाहित महिलेने त्याला जाण्यास प्रतिबंध केला. पाच वाजेपर्यंत तू इथे थांब असे ती म्हणत होती मात्र तो आता मला घरी जाऊ दे असे म्हणत होता त्यातून त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्याने घरात असलेल्या फावड्याने तिची हत्या केली आणि नग्न अवस्थेतील तिचा मृतदेह लपून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पहाटे काही गावकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला त्यावेळी त्याने तेथून पलायन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समारू गोड असे त्याचे नाव असून मागील एक वर्षापासून विवाहित प्रेयसीसोबत तो वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवत होता. रात्री अकराच्या सुमारास तो तिला भेटण्यासाठी गेल्यानंतर 11 ते पहाटे तीन या दरम्यानच्या काळात त्यांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानंतरही विवाहित प्रेयसी त्याला जाऊ देत नव्हती म्हणून त्यांच्यात वाद झाल्याने त्याने तिची हत्या केली असे सांगण्यात आलेले आहे. सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


शेअर करा