‘ काळे कपडे घातल्याने मूल होत नाही..माताजींचे कुंकू लाव नाहीतर..’ , महिला म्हणतेय मला..

शेअर करा

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरी देखील अंधश्रद्धेचे भूत काही नागरिकांच्या मानगुटीवरून उतरण्याचे नाव घेत नाही असाच एक संतापजनक असा प्रकार पुण्यातील हडपसर येथे उघडकीला आलेला असून 26 वर्षीय उच्चशिक्षित असलेल्या महिलेला काळे कपडे घातल्याने तुला मूल होणार नाही असे सांगत तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून तिला मारहाण आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्या लोकांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी पती हा एक उच्चशिक्षित तरुण असून त्याची पत्नी देखील उच्चशिक्षित आहे. सासरचे कुटुंबीय हे एका धार्मिक संस्थेशी संबंधित असल्याने त्यांच्यावर धर्म आणि अंधश्रद्धा याचा प्रमाणापेक्षा जास्त प्रभाव आहे. त्यातून ते त्यांच्या सुनेला सतत अंधश्रद्धेच्या नावाखाली ‘ काळे कपडे घालू नको.. काळे कपडे घातले तर मुले होत नाहीत ‘, असे सांगायचे. सुशिक्षित असलेल्या या सुनेने काही काळ त्यांचा त्रास सहन केला मात्र त्यानंतर त्यांची ही बंधने तिला जाचक वाटू लागली.

लग्नानंतर काही दिवसांनी ‘ माताजी यांनी दिलेले कुंकू लाव..’ . कुंकू पुसलेले दिसल्यानंतर तिला शिवीगाळ करणे असे प्रकार सुरु होते. सुनेने अनेक वर्षे त्यांचा त्रास सहन केला मात्र त्यानंतरही पती हा तिला इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अशाच पद्धतीचे अनैसर्गिक कृत्य करण्यास तिला भाग पाडत होता. सहकार्य न केल्यास तिला मारहाण देखील करत होता त्यातून आपल्याला गर्भपात देखील करावा लागला असेही या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे . लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पती, जाऊ, सासरे, दीर, सासु यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.


शेअर करा