पतीवर संशय म्हणून चक्क ‘ पोस्ट मार्टेम ‘ विभागात बायको आली अन त्याच दिवशी रात्री..

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून अनैतिक संबंधाच्या प्रकारावरून संतप्त झालेल्या पतीने पत्नीचा खून करून त्यानंतर पुन्हा स्वतः पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलेला असून लाकडी स्टूल पत्नीच्या डोक्यावर मारल्याने तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात तिचा पती पोलिस ठाण्यात हजर झाला.

उपलब्ध माहितीनुसार, परशुराम ब्राम्हणे ( वय 33 ) असे आरोपीचे नाव असून सोनाली ब्राह्मणे ( वय 36 ) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. परशुराम हा एका रुग्णालयात शवविच्छेदन विभागात काम करतो. त्याची पत्नी आणि दोन मुलींसह तो लष्करिबाग इथे राहतो. त्याचे एका सहकारी महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता त्यामुळे त्यांच्या दररोज वाद होत होते. परशुराम या महिलेसोबत आपली केवळ ओळख आहे असे तिला समजून सांगत होता मात्र त्याची पत्नी हिला हा प्रकार अनैतिक संबंधाचा असे वाटत होते.

या आधी देखील या पती-पत्नीत त्याच महिलेवरून अनेकदा वाद झाले होते. दोन दिवसापूर्वी सोनालीला पतीच्या वागण्यावर संशय आला आणि ती त्याला कल्पना न देता रुग्णालयात आलेली होती त्यावेळी परशुराम आणि संबंधित महिला हे एका खोलीमध्ये बोलत असल्याचे तिला दिसून आले आणि त्यानंतर तिथे त्यांचे खडाजंगी भांडण झाले. परशुराम याने पत्नीची समजूत काढून तिला दवाखान्यातून घरी पाठवून दिले.

परशुराम घरी आल्यानंतर पत्नीने पुन्हा एकदा त्याच महिलेवरून वाद घालण्यास सुरू केले आणि शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास परशुराम याने भांडण झाल्यानंतर लाकडी स्टूल पत्नीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारला त्यात तिचा मृत्यू झाला. रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली असून शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली . परशुराम याने पत्नीचा खून केल्यानंतर परशुराम हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे समजते.