
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून औरंगाबाद येथील सिडको परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यात आले त्यानंतर तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवत त्याचे फोटो काढण्यात आले आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला. तिला तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांचा देखील गंडा घातला आणि अखेर या महिलेने आरोपीच्या विरोधात पोलिसात धाव घेतली. शिवसेनेच्या शिंदे गटात काही दिवसांपूर्वी आरोपीने प्रवेश केला होता मात्र गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ज्योतीराम विठ्ठलराव धोंगडे ( राहणार मातोश्री नगर गारखेडा परिसर ) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी हा महापालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा करत होता त्यावेळी आरोपी आणि या महिलेची मैत्री जमली. पाण्याच्या बहाण्याने दोघांनी एकमेकांसोबत आपले नंबर शेअर केले आणि त्यानंतर ते संपर्कात राहू लागले. बाहेरही ते भेटत असल्याने या प्रकरणाची घरी खबर लागल्यावर महिलेच्या कुटुंबात देखील वाद सुरु झाले.
ज्योतीराम याने महिलेशी जवळीक साधत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायला सुरू केले आणि त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. महिला विरोध करत असताना देखील तो महिलेला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तसेच पुणे मुंबई या ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. दरम्यानच्या काळात ज्योतीराम याने महिलेवर दबाव टाकत त्याच्या दोन कारचे हप्ते देखील तिच्याकडूनच भरून घेतले.
सातत्याने दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होत असल्याने अखेर ही महिला गर्भवती राहिली आणि तिला ज्योतिरामपासून एक मुलगी झाली हा प्रकार लक्षात आल्यानंतर पतीने तिला घटस्फोट दिला. मुलगी झाल्यानंतर देखील ज्योतिराम सातत्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. महिला पुन्हा एकदा गर्भवती झाल्यानंतर त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले मात्र महिलेने नकार दिल्यानंतर त्याने जबरदस्तीने तिचा गर्भपात घडवून आणला. त्याने महिलेला मारहाण केली याच दरम्यान पोटातील बाळाचा मृत्यू झाला असेही महिलेचे म्हणणे आहे.
महिलेने ज्योतीराम याला लग्नासंदर्भात विचारले असता त्याने लग्नाला ठामपणे नकार दिला तसेच महिलेला आणि तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली . तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल दीड ते दोन कोटी रुपये घेतले त्यानंतर आपली मोठी फसवणूक झालेली आहे अशी भावना महिलेच्या मनात निर्माण झाली आणि तिने पोलीस ठाण्यात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल होत आरोपी ज्योतिराम धोंगडे याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.