देशासाठी शहीद झालेल्या व्यक्तीचा ‘ असाही ‘ अपमान , आईवडिलांचे केंद्रावर टीकास्त्र

शहीद झालेल्या व्यक्तीला सर्वसाधारणपणे मोठ्या मानसन्मानाने शौर्य पदक दिले जाते मात्र गुजरात येथील अहमदाबाद येथे एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून शहीद झालेले लान्स नायक गोपाल सिंह भदोरिया यांच्या आई-वडिलांना शौर्य पदक चक्क कुरियरने पाठवण्यात आलेले आहे. सदर प्रकाराविषयी भदोरिया कुटुंबियाकडून संताप व्यक्त केला जात असून शहीद मुलाच्या बलिदानाचा हा अपमान आहे असे खडसावत त्यांनी ते पदक परत पाठवलेले आहे. राष्ट्रपती भवन येथे मानाने आम्हाला हे पदक देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे .

आमच्या मुलाने देशासाठी बलिदान केलेले आहे मात्र आमच्या बलिदानाची अशा पद्धतीने किंमत केली जाईल अशी आमची अपेक्षा नव्हती. शौर्यपदक ही गुप्त ठेवण्याची वस्तू नाही मात्र सरकारकडून हे शौर्यपदक गुपचूप देण्यात येत आहे. माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिलेले आहे त्यामुळे देशासमोरचा त्याचा सन्मान झाला पाहिजे असे गोपाल सिंह यांच्या आई-वडिलांनी म्हटले आहे.

गोपाल सिंह यांना मुंबई येथील 2611 हल्ल्यात देशासाठी उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल याआधीही शौर्य पदकाने सन्मानित केलेले आहे. 2017 मध्ये जम्मू काश्मीर येथील पुलगाम जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात गोपाल सिंह यांना वीर मरण प्राप्त झालेले होते. 2007 साली त्यांचे लग्न झाले होते त्यानंतर २०१७ मध्ये ते शहीद झाले. पती- पत्नी आणि त्यांचे आई-वडील यांच्यातील मतभेदांमुळे त्यांना लाभ देण्यास विलंब झालेला होता त्यानंतर 2021 मध्ये न्यायालयाने आई-वडिलांना पुरस्कार संबंधित सर्व लाभ देण्याचे देण्याचा निर्णय घेतला मात्र शौर्य पदक चक्क कुरियरने पाठवण्यात आले म्ह्णून या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केलेला आहे .