शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश , म्हणाले ‘ शिवतीर्थावर यावेळी.. ‘

शिवसेना आणि बंडखोर गट यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळावा यावरून वाद सुरू असताना मुंबईतील शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर आपलाच मेळावा होणार आहे असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मुंबई तिथे व्यक्त केलेला आहे. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी कामाला लागा असेदेखील आदेश त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

शिवसेना भवनामध्ये विभाग प्रमुख आणि विविध पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या सोबतच शिवतीर्थावर आपलाच दसरा मेळावा होणार आहे त्याबद्दल मनात कोणताही संभ्रम ठेवू नका . महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिकांना सोबत घ्या आणि शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून दाखवा असेदेखील आदेश त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांना दिलेले आहेत.

सदर बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर निशाणा साधला त्यावेळी ते म्हणाले की, ‘ शिवसेना फोडणार म्हणणाऱ्यांनी आधी शिवसेनेचा इतिहास जाणून घ्यावा. फुटलेले सर्व नेते हे तोतया शिवसैनिक असून जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवणार आहे. दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थावरच शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो आणि यावेळी देखील तो होईल ‘, असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे.