पाच मुलांना बालकल्याण समितीकडे सोडून विवाहित महिला प्रियकरासोबत भुर्रर्र

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना राजस्थान येथे समोर आली असून प्रेमविवाहाचे हे अजब प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आले आहे. एका महिलेने तिचा पती आणि तिची पाच मुले यांना सोडून चक्क प्रियकरासोबत संसार थाटलेला आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेच्या प्रियकराला देखील पाच मुले असून त्यांच्या लग्नानंतर तब्बल दहा मुले आई आणि वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेले आहेत . या महिलेने आपल्या मुलांना बालकल्याण समितीकडे नेऊन सोडले आहे तर प्रियकराने त्याची पहिली पत्नी आणि पाच मुलांना आजी आजोबाकडे नेऊन सोडले आहे.

महिलेचा प्रियकर असलेल्या आपल्या मुलाची अशी वर्तणूक पाहिल्यानंतर या प्रियकराच्या वडिलांनी त्याला संपत्तीतून बेदखल केले आहे. राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यात हे प्रकरण समोर आले असून हरियाणा येथील तावडू येथील त्याची प्रेयसी नूरजहाँ हिलादेखील पाच मुले आहेत. नूरजहाँ हिचा विवाह 2007 मध्ये तय्यब खान नावाच्या व्यक्ती सोबत झालेला होता त्यानंतर पंधरा वर्षात त्यांना पाच मुले झाली त्यानंतर तिने तिचा प्रियकर असलेला मौसम खान नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. तो देखील विवाहित असून त्यालाही पाच मुले आहेत.

नूरजहान आपल्या मुलांना बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांकडे सोडून निघून गेली त्यावेळी मुले खूप रडत होती. समिती आयोगाच्या सदस्यांनी तिला तिचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. मौसम याने प्रेयसीसोबत लग्न केल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी मुले आणि सून यांना आपल्यासोबत ठेवलेले आहे मात्र त्याला संपत्तीतून बेदखल करण्यात आलेले आहे . या प्रेमी युगुलाला आपल्या जबाबदारीची कुठलीच जाणीव नाही असे मौसमच्या वडिलांनी म्हटले असून नूरजहाँ हिने देखील मौसमखान याच्या नादात सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि आपल्या पाच मुलांना बालकल्याण समितीकडे नेऊन सोडले आहे . त्यांच्या या वर्तणुकीवर सोशल मीडियात मोठी टीका केली जात आहे.


शेअर करा