पुण्यात खळबळ..डिलिव्हरी बॉय म्हणून आला अन चुंबन घेऊन गेला

पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून झोमॅटो जेवणाचे पार्सल घेऊन आल्यानंतर एका व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा प्रकार शहरातील येवलेवाडी परिसरात उघडकीला आला आहे. एका नामांकित सोसायटीत हा प्रकार शनिवारी रात्री घडलेला असून कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार, रईस शेख ( वय 40 राहणार कोंढवा ) असे आरोपीचे नाव असून तो झोमॅटो डिलिव्हरीचे काम करतो. येवलेवाडीतील तरुणी ही एका नामांकित सोसायटीत राहायला असून शनिवारी रात्री तिने ॲपवरून जेवण मागवले होते. ते घेऊन शेख हा सोसायटीत पोहोचला होता. जेवणाचे पार्सल दिल्यानंतर आरोपीने हा प्रकार केला असे तरुणीचे म्हणणे आहे.

तरुणीच्या म्हणण्यानुसार जेवणाचे पार्सल दिल्यानंतर त्याने फिर्यादीला पिण्याचे पाणी मागितले आणि पाणी पिल्यानंतर धन्यवाद म्हणण्याचा बहाणा करून त्याने फिर्यादी यांचा हात हातात घेतला. फिर्यादी यांनी हात सोडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपीने त्यांना आपल्या बाजूला ओढले आणि त्यांच्या गालाचे चुंबन घेतले . त्यानंतर या तरुणीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत .