काकीच्या बेडवर आक्षेपार्ह अवस्थेत सापडला पुतण्या , संपूर्ण गावावर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून बिहारच्या पूर्णिया येथे हे प्रकरण समोर आले आहे. काकी आणि पुतण्या यांना आक्षेपार्ह अवस्थेत गावकऱ्यांनी पकडल्यानंतर सुरुवातीला त्यांना जोरदार मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचे लग्न देखील लावून देण्यात आले . उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी या प्रकाराचा एक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करून दिला. आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, पूर्णिया जिल्ह्यातील पिपरा गावात हा प्रकार समोर आला असून 12 सप्टेंबर रोजीची घटना आहे. गावात राहत असलेल्या एका महिलेचे तिच्या पतीच्या मोठ्या भावाच्या अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. सुरुवातीला ते दोघे लपून-छपून भेटत होते मात्र त्याने नंतर चक्क या महिलेच्या घरी येण्यास सुरुवात केली. महिलेच्या पतीला या प्रकरणाचा सुगावा लागला आणि त्याने रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला आणि त्यानंतर गावकर्‍यांना घेऊन अचानकपणे घरात घुसला त्यावेळी हा पुतण्या आणि त्याची पत्नी आक्षेपार्ह अवस्थेत गावकऱ्यांना सापडले.

संतप्त झालेल्या पतीने पत्नीला जोरदार शिवीगाळ केली मात्र ग्रामस्थांनी महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तिने यापुढे पतीसोबत नांदण्यास नकार दिला असून अखेर गावकऱ्यांनी दोघांचाही विवाह लावून दिला.अल्पवयीन असलेला पुतण्या हा लग्न करण्यास नकार देत होता मात्र ग्रामस्थांनी जबरदस्तीने हार काकीच्या गळ्यात टाकण्यास सांगितले. महिलेच्या पतीचे वय 44 वर्षे असून पत्नीचे वय 40 वर्षे आहे तर तिच्या प्रियकराचे वय हे अवघे 14 वर्षे आहे. दोघांमधील नाते समाजमान्य नाही त्यामुळे या विवाहाला पतीचा विरोध असून गावकऱ्यांनी देखील अल्पवयीन मुलाचा विवाह लावला म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

महिलेला तीन मुले असून तिचा पती पंजाब इथे नोकरी करतो. सुमारे दोन ते तीन महिन्यांनी तो घरी येत असायचा मात्र याच दरम्यान विवाहित असलेली ही महिला एकटी पडलेली होती आणि त्यानंतर तिच्या पुतण्याने तिच्या घरी येण्यास सुरुवात केली. काही दिवसात त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि या प्रकरणाची कुणकुण काही मित्रांच्या माध्यमातून पतीला लागली. अचानकपणे एके दिवशी पती घरी आला आणि दरवाजा उघडला त्यावेळी दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. गावकरी देखील पतीच्या सोबत होते त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा व्हिडीओ बनवला त्या दोघांचे लग्न लावून देण्यात आल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मात्र महिलेचा प्रियकर अल्पवयीन असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.