महाराष्ट्र हादरला..दुसरीही मुलगीच झाली म्हणून क्रूरतेची मर्यादा ओलांडली

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे समोर आलेली असून कोळीमळा परिसरात लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या म्हणून पतीने पत्नीला विहिरीत ढकलून तिचा खून केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत ( वय 29 ) असे खून करण्यात आलेल्या विवाहित महिलेचे नाव असून तिचे नातेवाईक मिलिंद सावंत ( राहणार कोल्हापूर ) यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली आहे. पोलिसांनी महिलेचा पती कौस्तुभ सरनोबत याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

लग्न झाल्यानंतर आपल्याला मुलगा हवा अशी कौस्तुभ यांची इच्छा होती मात्र राजनंदिनी यांना दोन्ही मुलीच झाल्या त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाले होते. रविवारी पहाटे फिरायला जाण्याचा बहाणा करत राजनंदिनी हिला तो दुचाकीवरून घेऊन गेला आणि रस्त्यापासून 30 ते 40 फूट अंतरावर असलेल्या शेतात पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरी तिला ढकलून दिले. तिला पोहता येत नसल्याने तिचा मृत्यू झाला. सदर घटनेबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात असून या पतीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.