
माणसाचा सर्वाधिक जवळचा पशु म्हणून कुत्र्यांची ओळख आहे मात्र काही नागरिक अनेकदा क्रूरतेच्या मर्यादा देखील पार करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून राजस्थानमधील हा व्हिडिओ आहे. एका कुत्र्याला गाडीला बांधून क्रूरपणे घेऊन जात हा व्यक्ती त्याच्यावर गाडीच्या वेगाने पळण्यासाठी जबरदस्ती करत आहे. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो पेशाने डॉक्टर असल्याचे समजते . पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याची गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे.
भाजपच्या एका नेत्याने यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी ही गाडी कोणाची आणि सीसीटीव्ही यांच्या माध्यमातून शोध घेतला असता सदर डॉक्टर हा या आधी देखील अशाच पद्धतीने इतरही प्राण्यांना असाच त्रास देतो असे समोर आले आहे. प्राण्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या पुकार या संस्थेने या संदर्भात पाठपुरावा केला. सदर घटनेत कुत्र्याच्या पायाला अनेक जखमा झालेल्या असून या डॉक्टरच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर देखील काही यूट्यूब चॅनल, ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला असून ‘ हा व्हिडीओ इतका शेअर करा की पोलीस आयुक्तपर्यंत पोहोचला पाहिजे आणि या डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे तसेच त्याचे लायसन्स देखील रद्द झाले पाहिजे ‘ असे संतप्त आवाहन करण्यात आली होती त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.