रामू बनला होता अशोक यादव , तब्बल २५ वर्षांनी हत्याकांडाचा आरोपी जेरबंद

शेअर करा

काही गुन्हे समोर आल्यानंतर आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना कित्येक वर्ष आरोपीच्या मागावर राहावे लागते. असेच एक प्रकरण दिल्ली येथे समोर आलेले असून 1997 साली घडलेल्या या घटनेत तब्बल 25 वर्षांनंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. दिल्लीच्या तुगलकाबाद येथे हे प्रकरण घडले होते . रविवारी दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , उत्तर प्रदेश येथील लखनऊ येथे राहणारा रामू नावाचा आरोपी हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आढळून आलेला आहे. किशनलाल हत्याकांड हे 1997 साली दिल्ली येथे घडलेले होते तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. मयत किशनलाल याची 1997 साली थंडीच्या दिवसात चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती.

सदर प्रकार घडला तेव्हा किसनलाल याची पत्नी सुनीता ही गरोदर होती. तिच्या पहिल्याच बाळाचा जन्म होणार होता मात्र त्याआधीच तिच्या पतीने प्राण गमावले. घटनेतील मुख्य आरोपी असलेला रामू हा घटना घडल्यानंतर फरार झालेला होता आणि त्यानंतर तो पोलिसांच्या ताब्यात आलाच नाही. दिल्ली पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत होते त्यानंतर तो लखनऊ फरुखाबाद या ठिकाणी गेला आणि तिथे त्याने वेशभूषा तसेच राहणीमानाची पद्धत सर्व काही बदलत अशोक यादव या नावाने स्वतःची नवी ओळख बनवलेली होती.

आपल्या नवीन नावाने त्याने सर्व काही बनावट पुरावे आणि कागदपत्रे देखील बनवली मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा शोध लावायचा असे ठरवलेच होते. काही गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना रामू हा लखनऊ येथे राहत असल्याचे समजले आणि पोलिसांनी काही दिवस साध्या वेषात त्याच्यावर पाळत ठेवली. त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने किशनलाल हत्याकांडाची कबुली दिलेली असून त्याची पत्नी असलेल्या सुनीता यांनी आपल्या पतीच्या मारेकऱ्याला पोलीस अटक करतील याची आशाच सोडली होती मात्र अखेर पोलिसांचे धागेदोरे लखनऊपर्यंत जाऊन पोहोचले आणि आरोपीला अटक करण्यात आली.


शेअर करा