महाराष्ट्राबाहेर प्रकल्प गेल्यानंतर आपण काय फक्त दहीहंडी फोडायची का ?

शेअर करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर ऑपरेशन लोटसमधून राजकीय बदल करून प्रकल्प पळवण्याचा देखील उद्देश असू शकतो अशी टीका केलेली असून गुजरातचे मन सांभाळताना महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. आपण काय फक्त दहीहंडी फोडायची का ? असा देखील सवाल त्यांनी केलेला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाणे हे दुर्दैवी असून त्यांना पुण्याजवळील तळेगाव येथील जागा मान्य होती पण मागील दोन-तीन महिन्यात काय घडले आणि नवे सरकार काय करत होते हे मात्र कळत नाही. आता काहीही कारणे सांगण्यात अर्थ नाही. तीन महिने आपण काय करत होतात ते सांगा. अतिवृष्टीने 20 लाख हेक्टर शेतातील शेतीचे नुकसान झालेले आहे. राज्य सरकारने नव्या मदतीच्या घोषणा केल्या मात्र केवळ पंचनामेच झाले आहेत.

पालकमंत्री मंत्रिमंडळ अस्तित्वातच नसल्याने प्रशासन देखील ठप्प झालेले आहे त्यामुळे सरकार आहे का ? कोणी रिव्हॉलर काढतं तर कोणी अधिकाऱ्यांना मारतेय असा सगळा कार्यक्रम सुरू आहे. सरकार जनतेसाठी आहे मात्र त्यांच्यातच एकमत होत नसल्याने अजूनही त्यांचे सत्कार सोहळे सुरू आहेत. तुमच्यात मतभेद असतील तर सरकार चालवण्याला काही अर्थ आहे का नाही हे तुम्हीच पहा असा देखील खडा सवाल त्यांनी विचारलेला आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस सोडण्याचा प्रश्नही येत नाही असे देखील त्यांनी पुढे म्हटले.


शेअर करा