अकलेचा सर्वनाश हीच भाजपाईंची ओळख , काँग्रेस नेत्याकडून ‘ तो ‘ व्हिडीओ शेअर

भारतात मयत व्यक्तीच्या फोटोला हार घालण्याची प्रथा आहे मात्र भाजपच्या नेत्यांना काय झालंय हे काही समजत नाही . चमचेगिरी करण्याच्या नादात एका भाजपच्या नेत्याने मर्यादा ओलांडली असून पंतप्रधान मोदी यांच्या फोटोलाच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हार घातलेला आहे . धक्कादायक म्हणजे हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये महाशय मंत्री असून राकेश सचान असे त्यांचे नाव आहे.

उत्तर प्रदेशचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री असलेले राकेश सचान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला हार घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा असून त्यासाठी सरकारचे मंत्री राकेश सचान एका कार्यक्रमाला हजर होते. राकेश सचान यांनी एक मोठा हार उचलला आणि तो पीएम मोदींच्या फोटोला अर्पण केला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे लोक या मंत्र्यांवर जोरदार टीका करत असून इतरांना धार्मिक संस्कारी उपदेश करणाऱ्या भाजपच्या मंत्र्याला हे समजू नये यावर संताप देखील व्यक्त करत आहेत.

एका पत्रकाराने व्हिडिओ शेअर करत लिहिले की राकेश सचान एक अद्भुत मंत्री आहेत, त्यांना पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करायचा होता. पण फोटोवर हार चढवला. फोटोला हार चढवण्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का, असा प्रश्न देखील एका युजरने उपस्थित केला आहे. सदर महाशय हे आधी सपामध्ये होते त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि तिथून ते भाजपमध्ये आलेले आहेत.